'हे हिंदुत्व असू शकतं का?'; खुर्शीद यांच्या घराची जाळपोळ, दगडफेक

वादग्रस्त पुस्तकावरून नैनितालमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या घराची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे.
'हे हिंदुत्व असू शकतं का?'; खुर्शीद यांच्या घराची जाळपोळ, दगडफेक
'हे हिंदुत्व असू शकतं का?'; खुर्शीद यांच्या घराची जाळपोळ, दगडफेकSaam TV

संतोष शाळीग्राम (नवी दिल्ली)

वादग्रस्त पुस्तकावरून नैनितालमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या घराची जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली आहे. त्यांनी या घटनेची माहिती फेसबुकवर शेअर केली आहे. या बदमाशांच्या हातात भाजपचा झेंडा होता आणि ते जातीयवादी घोषणा देत होते, असे त्यांनी म्हटले आहे. माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद हे त्यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकामुळे वादात सापडले आहेत. सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली असून हिंदुत्वाचे राजकारण धोकादायक असल्याचे वर्णन केले आहे.

या घटनेची छायाचित्रे फेसबुकवर शेअर करत सलमान खुर्शीद म्हणाले, मी अजूनही चूक आहे का? हे हिंदुत्व असू शकते का? त्याचवेळी या घटनेवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांची प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी ट्विट केले असून, खुर्शीद यांनी आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताचा गौरव केला आहे आणि देशांतर्गत स्तरावर नेहमीच उदारमतवादी, मध्यवर्ती, सर्वसमावेशक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. देशातील राजकारणात असहिष्णुता वाढत आहे, त्याचा निषेध केला पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com