Accident; जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यात चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात
Accident; जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू
Accident; जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू Saam Tv

कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यात चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि जीप यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा जागीच चुराडा झाला आहे.

या भीषण अपघातांमध्ये मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीपची ट्रकला धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती वर्तवली जात आहे.

हे देखील पहा-

काही जखमींवर कोलार एसएनआर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमींना बेंगळुरु मधील रुग्नालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. चिंतामणी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे. श्रीनिवासपुराचे आमदार रमेशकुमार, मलुरचे आमदार के.वाय नांजे गोवडा आणि चिंतामणीचे आमदार कृष्णा रेड्डी यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

Accident; जीपची ट्रकला धडक, आठ जणांचा जागीच मृत्यू
Boat Accident : आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीत दोन बोटींची धडक, ७० पेक्षा जास्त जण बेपत्ता

रस्त्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघताची दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. अपघातग्रस्त जीपमध्ये चालकासह १७ जण प्रवास करत होते. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रवासी वाहतूकीकरिता जीपचा वापर सर्रास केला जातो. पोलिसांनी यावर आतापर्यंत एकदाही कारवाई केली नाही. अथवा साधी तपासणी देखील केली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पोलिसांनी जीप चालकाला अटक केली असून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com