जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या, लालची मुलीसह नवऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एका मुलीने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या, लालची मुलीसह नवऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!Saam Tv

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मुलीने आपल्या जन्मदात्या आईच्या डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. ही हत्या पैशांसाठी केली असल्याचं पोलिस तपासातून समोर आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैतूल येथील राणीपूर परिसरात हायवे शेजारील जंगंलात ६ जून रोजी एका वृद्ध महिलेचा मृतदेह पोत्यात सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस तत्काळ घटना स्थळावरती पोहचले असता त्यांना पोत्यात एक सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेह ६ ते ७ दिवस पडून असल्यामुळे कुजला होता आणि त्यामुळे त्याचा वास येत होता.

या प्रकरणाची पोलिसांनी (Police) चौकशी केली असता सदरचा मृतदेह ६० वर्षीय भागीरथी झरवडे यांचा समजलं तर या हत्येप्रकऱणी पोलिसांनी आरोपी मुलगी आणि तिच्या पतीला अटक केली असल्याचं बैतूल येथील SP सिमाला प्रसाद यांनी सांगितलं आहे.

म्हणून मुलीने केली आईची हत्या ?

भागीरथी या काही दिवसांपासून त्यांची लहान मुलगी उषा वाईकरच्या घरी रहात होत्या. भागीरथी यांनी त्यांच्या हक्काचा एक प्लॉट विकला होता त्या प्लॉटचे त्यांना ५ लाख ८२ हजार रूपये मिळाले होते. ते पैसे त्यांनी मुलगी उषा वाईकरच्या खात्यात जमा केले. हे पैसे आई दोन्ही बहिणींमध्ये वाटणार होती. मात्र, हे पैसे फक्त आपणाला एकटीला मिळावे अशी लहान मुलीच्या मनात लालसा निर्माण झाल्यामुळे तिने आईला या पैशांच वाटप न करण्याबाबत सांगितलं असता दोघींमध्ये वाद झाला या वादा दरम्यान उषाने आपल्या आईच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

दरम्यान, उषाने आईची हत्या केल्यानंतर पतीच्या मदतीने मृतदेह पोत्यात भरुन हायवे जवळच्या जंगलात नेऊन फेकला. काही दिवसानंतर आईचा फोन खुप दिवसांपासून आला नसल्याने मोठ्या बहिणीने उषाला फोन करून आईबाबत विचारणा केली असता, आई नर्मदापुरमला गेली होती, तिथे आंघोळ करताना ती नदीत बुडाली असून तिची बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली असल्याची माहिती उषाने बहिणीला दिली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता छोटी मुलगी उषाने आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी उषा आणि तिचा पती करण यांना अटक केली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com