South Africa Cobra in Plane: पायलटला दरदरून घाम फुटला, 11000 फुटांवर विमान गेल्यावर सीटखाली दिसला किंग कोब्रा, पुढे घडलं ते...

King Cobra: ज्याच्या हातामध्ये या सर्व प्रवाशांना घेऊन जाण्याची धुरा असते त्या पायलटजवळ (Pilot) एखादा कोब्रा आला असे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल ना.
King Kobra In plane
King Kobra In planeSaam Tv

South Africa News: आतापर्यंत विमानामध्ये उंदीर, झुरळ, साप दिसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. हजारो फूट उंचीवर असताना विमानात अशाप्रकारचे प्राणी आढळल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याच्या अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. पण ज्याच्या हातामध्ये या सर्व प्रवाशांना घेऊन जाण्याची धुरा असते त्या पायलटजवळ (Pilot) एखादा कोब्रा आला असे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण ही घटना खरी असून दक्षिण अफ्रिकेत (South Africa) घडली आहे.

King Kobra In plane
PM Narendra Modi Speech On Alexa: यापुढे अलेक्सा आणि अ‍ॅमेझॉन म्युजिकवर ऐकता येणार पीएम मोदींचं भाषण, कसे ते बघा!

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या विमानात कोब्रा आढळला ते दक्षिण अफ्रिकेच्या ब्लूमफोंटीनवरुन प्रिटोरियाला जात होते. हे विमान पायलट रुडॉल्फ एरसमस हे चालवत होते. रुडॉल्फ यांनी नेहमीप्रमाणे आपल्या कामाची सुरुवात केली आणि विमानाचे उड्डाण केले. ज्यावेळी विमान ११ हजार फुटांवर गेले त्यावेळी त्यांना कळाले की, त्यांच्या सीटखाली किंग कोब्रा आहे. सुरुवातीला कोब्राला पाहून ते घाबरले त्यांना काय करायचे ते कळत नव्हते. पण शेवटी प्रसंगावधान साधत त्यांनी विमानाचे एमर्जन्सी लँडिंग केले आणि स्वत:सोबत प्रवाशांचे देखील प्राण वाचवले.

King Kobra In plane
Instagram Influencer : न्यूड फोटो पाठवायची अन् मग करायची ब्लॅकमेल; आलीशान कारमध्ये फिरणाऱ्या इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सरला अटक

बीबीसी या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये रुडॉल्फ यांनी सांगितले की, 'मी विमानाचं उड्डान केलं. विमान 11 हजार फुटांवर गेल्यावर मला माझ्या पाठीवर काही तरी वळवळ करत असल्याचे आणि थंडगार जाणवत होते. सुरुवातीला मला वाटले की माझी पाण्याची बॉटल असावी. पाण्याची बॉटल व्यवस्थित बंद न केल्यामुळे त्यातून पाणी सांडत असावे आणि माझा शर्ट ओला झाला असावा असे मला वाटले. पण ज्यावेळी मी डावीकडे वाकून पाहिलं तेव्हा मला तिथे किंग कोब्रा दिसला. तो सीटच्या आतमध्ये डोकं घुसवायच्या प्रयत्न करत होता.'

King Kobra In plane
Stormy Daniels Case : न्यूयॉर्क कोर्टाचा स्टॉर्मी डेनियलला दणका; ट्रम्प यांना द्यावी लागणार मोठी रक्कम

सुरुवातीला कोब्रा पाहून मला भीती वाटली. माझा मेंदू बंद पडला होता. मला कळतच नव्हतं की काय चाललंय. विचार केला की कोब्रा जातीचा साप चावला तर पुढच्या 30 मिनिटांत माणसाचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे मला विमानात भीतीचे वातावरण पसरवायचे नव्हतं. शेवटी मी शांतपणे विचार केला आणि काय करायचे ते ठरवले. त्यानंतर मी प्रवाशांना शांतपणे विमानात अजून एक प्रवासी असल्याचे सांगितले. हा प्रवासी कोब्रा असून तो माझ्या सीटखाली असल्याचे सांगितल्यानंतर सर्व प्रवासी शांत झाले.'

King Kobra In plane
Temple Vandalised In Canada : कॅनडात हिंदू मंदिरात तोडफोड, समाजकंटकांनी भारताविरोधात ओकले विष

त्यांनी पुढे सांगितले की, 'मी घाबरलो असल्याचे प्रवाशांना कळाले असते तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. त्यामुळे मी सर्वांना सांगितले की आपल्याला इमर्जन्सी लँडिंग करायचे आहे. पिन पडली तरी आवाज येणार नाही ऐवढे शांत आणि स्तब्ध सर्व प्रवासी बसले होते. त्यानंतर मी वेल्कोम शहरात इमर्जन्सी लँडिंग केलं. त्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.' ही घटना ऐकल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. पण पालयट रुडॉल्फ यांच्या या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

Edited By - Priya Vijay More

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com