King Cobra : अरे बाप रे बाप! स्कूटीमधून निघाला भलामोठा साप; Video पाहून थरकाप उडेल

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी सुद्धा चक्रावून गेलेत.
King cobra snake inside Scotty
King cobra snake inside Scotty Saam tv

Cobra Snake Video : पावसाळा सुरू झाला की ठिकठिकाणी साप निघण्याच्या घटना घडतात. बिळात पाणी गेल्याने साप रस्त्यावर किंवा मानवी वस्तीकडे येतात. आपला जीव वाचावा यासाठी ते एखाद्या अडगळीच्या ठिकाणचा सहारा घेत असतात. मात्र, हे साप (Cobra Snake) जर चूकुन नजरी पडले तर उरात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी सुद्धा चक्रावून गेलेत. (King Cobra Snake Inside Scooty Watch Viral Video)

काय आहे व्हिडीओत?

सोशल मीडियावर एका भल्यामोठ्या सापाचा (Snake) व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हिडीओत एक मोपेड म्हणजेच स्कूटी दिसत आहे. या स्कूटीच्या हॅंडलमध्ये एक भलामोठा साप लपलेला दिसत आहे. प्राप्त माहितीनुसार एक व्यक्ती स्कूटी घेऊन बाहेर फिरण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याला आपल्या स्कूटीच्या हॅंडलजवळ सापाची शेपटी दिसली. अचानक साप दिसल्याने तो घाबरला. रस्त्याच्या कडेला स्कूटी लावत त्याने तातडीने सर्पमित्राला फोन केला. (Snake Cobra Video)

हे देखील पाहा -

स्कूटीमध्ये भलामोठा साप असल्याचं कळताच नागरिकांनी सापाला बघण्यासाठी (Viral Video) मोठी गर्दी केली होती. सर्पमित्र आल्यानंतर त्याला स्कूटीच्या हँडलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. या घटनेचा व्हिडीओ तिथे उपस्थित असणाऱ्या कोणीतरी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला होता. जो आता सोशल मीडियाच्या जगात झपाट्याने शेअर केला जात आहे. (King Cobra Video India)

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याची अद्यापही पुष्टी झालेली नाही. मात्र, व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, साप आरशाच्या बाजूने आतमध्ये गेल्याचं दिसत आहे. सर्पमित्राने आरशाच्या बाजूचे कवर बाजूला करताच, त्यातून भलामोठा कोब्रा साप बाहेर येताना दिसून येतोय. पावसाळ्यात गाडी चालवताना प्रत्येकाने लक्षात ठेवावी अशीच ही घटना आहे.

कोब्रा साप बाहेर येताच आपल्या बचावासाठी तो सर्पमित्रावर हल्ला देखील करतो. मात्र सर्पमित्र मोठ्या चपळाईने या सापाला रेस्कू करत घेऊन जातो. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. साप हे ऊन, थंडी आणि पावसापासून आसरा मिळवण्यासाठी मनुष्यनिर्मित मजबूत वस्तू जसे की घर,छप्पर, गाडी इत्यादी ठिकाणी जाऊन बसू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात आपल्या आजूबाजूला सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com