
वृत्तसंस्था : कर्नाटक मधील बेळगावी या ठिकाणी एका महाराजांचा कार्यक्रम दरम्यान प्रवचन देत असताना हृदयविकाराचा झटका येऊन मंचावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगणा बसव स्वामी (वय-५३) असे मृत्यू पावलेल्या महाराजांचे नाव आहे. ही घटना ६ नोव्हेंबरची आहे, मात्र आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे.
हे देखील पहा-
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक मधील बसगावी या ठिकाणी संगणा बसव स्वामी आपल्या अनुयायांना प्रवचन देत असताना अचानक बेशुद्ध झाले होते. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात आले होते. मात्र, हृदयविकारा तीव्र धक्क्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली आहे.
बसव स्वामी हे बालोबाला मठाचे आणि बसवयोग मंडप ट्रस्टचे प्रमुख होते. ६ नोव्हेंबर दिवशी त्यांचा वाढदिवस होता आणि ते त्यांच्या मठात अनुयायांना संबोधित करत होते. प्रवचन दरम्यान ते अचानक कोसळले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. वाढदिवसाच्या दिवशीच घडलेल्या दुर्देवी घटनेने अनुयायांमध्ये मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, २ महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या साक्री तालुक्यात जामदे गावात कीर्तनकार ह.भ.प.ताजुद्दीन महाराज शेख यांना कीर्तन करताना अचानक छातीत कळ येऊन ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्यांचे निधन झाले होते. त्यानंतर ताजुद्दीन महाराज यांना त्यांचे मूळ गाव जालना जिल्ह्यामधील घनसांगवी येथील बेदलापुरी गावच्या आश्रमात हिंदू धर्मानुसार समाधी देण्यात आली आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.