Cheetah In India: 'त्या' ८ चित्त्यांचं नामकरणं झालं; PM मोदींनी ठेवलं खास नाव!

जाणून घ्या 'त्या' 8 चित्त्यांची नावं
Cheetah In India
Cheetah In IndiaSaam Tv

Cheetah In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबियातून आणलेले आठ चित्ते कुनो अभारण्यात सोडण्यात आले. तब्बल सत्तर वर्षांनंतर भारतात चित्ते परतले आहेत. या 8 चित्तांमध्ये 5 मादी आणि तीन नर चित्ते आहेत. आठ चित्त्यांना घेऊन नामिबियातून विशेष विमान ग्वाल्हेर विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी या चित्त्यांना (Cheetah कुनो अभयारण्यात सोडलं आलं.

त्यानंतर आता या आठही चित्त्याचं नामकरण करण्यात आलं आहे. पंतप्रधानांनी यातल्या मादी चित्त्याचं नामकरण केलं. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबियाहून चित्ते आणण्यात आले आहेत.

Cheetah In India
कोर्ट आवारात अस्‍वलाचा धुमाकूळ; लोकांनी केली तोबा गर्दी

ओबान, फ्रेडी, एल्टन, सावन्नाह, आशा, सिबली, सैसा आणि साशा अशी या आठ चित्त्यांची नावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एका मादी मादी चित्त्याचं नाव ठेवलं आहे. या मादी चित्त्याचं नाव आशा असे ठेवण्यात आलं आहे. तर, इतर चित्त्यांची नावे नामिबियामध्ये ठेवण्यात आली होती. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी नामिबियाहून चित्ते आणण्यात आले आहेत.

कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. या अभयारण्यात चित्त्यांसाठी 12 किमी लांब कुंपण उभारण्यात आले आहे. चित्त्यांना सुरुवातीला या अधिवासात ठेवण्यात येणार आहे. तसेच या चित्त्यांना 24 तास देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. चित्त्यांना येथील प्राण्यांची शिकार करावी लागेल. भारतात आढळणारं हरीण आफ्रिकेत आढळतं नाही. त्यामुळे या प्राण्याची शिकार करणं चित्त्यांना जमेल का, हा प्रश्न आहे. निरीक्षणानंतर चित्त्यांना अभयारण्यात सोडण्यात येणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com