Kolkata: कोलकातातील 'ही' ऑफबीट ठिकाणे करतील सहलीचा आनंद द्विगुणीत

कोलकाता हे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शहराला समृद्ध इतिहास आणि संस्कृती आहे.
Kolkata: कोलकातातील 'ही' ऑफबीट ठिकाणे करतील सहलीचा आनंद द्विगुणीत
Kolkata: कोलकातातील 'ही' ऑफबीट ठिकाणे करतील सहलीचा आनंद द्विगुणीत

कोलकाता (Kolkata) हे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शहराला समृद्ध इतिहास आणि संस्कृती आहे. या शहरात अप्रतिम पर्यटनस्थळे आहेत. तुम्ही चित्रपटांमध्ये काळ्या-पिवळ्या टॅक्सी अनेक वेळा पाहिल्या असतील, कोलकातामध्ये तुम्हाला या टॅक्सी पाहायला मिळतील. कोलकत्यातील स्मारके, संग्रहालये, गॅलरी सर्व त्यांचा इतिहास सांगतात. कोलकत्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत, पण विशेष म्हणजे तेथे अशी काही ऑफबीट ठिकाणेही (offbeat destinations) आहेत जिथे तुम्ही शांततेत वेळ घालवू शकता.

हे देखील पहा-

जंपुट

जर तुम्हाला शांततापूर्ण वेळ घालवायचा असेल तर जंपुट (Junput) तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. आजूबाजूला सुंदर समुद्र आणि खजुरीची झाडे तुम्हाला गोवा किंवा केरळला आल्यासारखे वाटू भासवतात. येथे सागरी जीवशास्त्र संग्रहालय आहे, जिथे आपण जलचरांबद्दल जाणून घेऊ शकता. जगन्नाथ मंदिर येथून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे, तिथेही तुम्ही जाऊ शकता.

Kolkata: कोलकातातील 'ही' ऑफबीट ठिकाणे करतील सहलीचा आनंद द्विगुणीत
Indian Food history: तुम्हाला माहित आहे का, 'हे' पदार्थ मुळचे भारतीय नाहीत

सोनाझुरी

सोनाझुरी (Sonazuri) हे स्वच्छ जंगलांपैकी एक मानले जाते. येथे तुम्हाला हरणांपासून अनेक रंगीबेरंगी पक्षी दिसतात. या ठिकाणी आदिवासी जमातीचे लोक राहतात. जंगलाजवळ एक नदी आहे. रवींद्रनाथ टागोरांनी या ठिकाणी बराच वेळ घालवला. त्यांच्या नावावर एक आश्रमही आहे.

ताकी (taki)

जर तुम्ही कोलकाता जवळील सर्वोत्तम पिकनिक स्पॉट्स शोधत असाल तर तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. हे शहरापासून 65 किमी दूर आहे. जंगल आणि शेतांमुळे ही हिरवीगार जागा आहे. येथे तुम्ही इच्छामती नदीच्या काठावर पिकनिक करू शकता.

Edited By- Anuradha

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com