CoronaVirus Live Updates: दिलासादायक! कोरोना रुग्णसंख्येत घट; गेल्या 24 तासांत देशात 6561 रुग्णांची नोंद, 142 मृत्यू
वृत्तसंस्था: जगभरामध्ये कोरोनाचा (Corona) थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येने तब्बल ४४ कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या ४४०,६४८,०८२ वर येऊन पोहोचली आहे. तर ५,९९३,०६६ लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. भारतात देखील काही महिन्याअगोदर कोरोनाचा (Corona) धोका वाढला आहे. (last 24 hours 6561 patients were reported country 142 died)
हे देखील पहा-
रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र, आता देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसून येत आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या (Corona) संख्येने तब्बल ४ कोटींचा आकडा केला आहे. असे असताना यादरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशात नव्या रुग्णांच्या (patients) संख्येत मोठी घट झाली आहे. आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
मागील २४ तासांत देशभरात कोरोनाचे ६५६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १४२ जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४,२९,४५,१६० वर येऊन पोहोचली आहे. तर कोरोनाने देशामध्ये ५ लाखांहून जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासामध्ये कोरोनाचे ६ हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४,२९,४५,१६० वर पोहोचली आहे. देशात कोरोनाग्रस्तांपैकी ७७,१५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे ५,१४,३८८ जणांनी आपला जीव गमावला आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.