Dance Video : लतादीदींच्या गाण्यावर पाकिस्तानी तरुणीचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Pakistani Girl Dance Video
Pakistani Girl Dance Video Saam Tv

Pakistani Girl Dance Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत पाकिस्तानी तरुणी लतादीदींच्या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहे.

Pakistani Girl Dance Video
Shraddha Walkar : श्रद्धा वालकर हत्या प्रकरण; आरोपी आफताबचा आणखी एक धक्कादायक खुलासा

व्हायरल झालेला व्हिडीओ एका लग्न समारंभातील असल्याचं दिसून येत आहे. या समारंभात लता मंगेशकर यांच्या मेरा दिल ये पुकारे आजा गाण्यावर पाकिस्तानी तरुणी डान्स (Dance Video) करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडीओमध्ये डान्स करणाऱ्या तरुणीचे नाव आयशा असल्याचं कळतंय.

आयशाने लूज फिट कुर्ता आणि पँट घातली आहे. ज्यामध्ये ती डान्स करताना दिसत आहे. ती खूप लक्षपूर्वक नाचत आहे. तिच्या लखलखत्या पावलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आयशा डान्स करत असताना अनेक महिलाही तिथे बसलेल्या दिसून येत आहे.

आयशानेही हातात कलिरे घातले होते, ज्यावरून ती नववधू आहे, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे. मात्र, खरंच तिने आपल्याच लग्नात डान्स केला की ती दुसऱ्याच्या लग्नात नाचत आहे. याची पुष्टी अद्यापही झालेली नाही. हा व्हिडिओ आधी टिक टॉकवर शेअर करण्यात आला आणि नंतर तो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. व्हिडीओ पाहून नेटकरी आयशाचं कौतुक करीत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com