
Crime News: हैदराबाद येथून काळीज सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे एका प्रियकराने आपल्याच प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. दिल्लीच्या श्रद्धा वालकर हत्याकांडाप्रमाणे या घटनेत मुलीची हत्या करण्यात आली आहे. यामध्ये प्रियकराने आपल्या घरी प्रेयसीचे तुकडे केले आणि फ्रिजमध्ये भरून ठेवले. वास येऊनये यासाठी त्याने संपूर्ण घरात अत्तर फवारले होते. (Latets Crime News)
त्याने प्रेयसीचे हे तुकडे एक एक करून नदीत आणि नाल्यात फेकले. या घटनेची कोणालाच काही माहिती नव्हती. १७ मे रोजी पोलिसांना या घटनेचा सुगावा लागला. त्यांना शहरातील एका मोठ्या मुसी नदीमध्ये तरुणीचं मुंडकं मिळालं. त्याने एकच खळबळ उडाली. ही हत्या नेमकी कोणी केली याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली. जवळपास ७ दिवस शोध घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
दक्षिण-पूर्व झोन डीसीपी रूपेश चेन्नुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. चंद्र मोहन असं आरोपीचं नाव आहे. तो शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंगचे काम करतो. ५५ वर्षीय या नराधमाने आपल्याच लिव्ह ईन पार्टनरची हत्या केली आहे. यारम अनुराध रेड्डी असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती ४८ वर्षांची होती.
१५ वर्षांच प्रेम एका झटक्यात संपलं
पोलिसांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. सदर महिला घटस्फोटीत होती. त्यानंतर बी. चंद्र मोहनशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. सुरुवातीला दोघांच्या प्रेमात गोडवा होता. मात्र नंतर त्यांच्यात खटके उडू लागले.
महिलेने त्याच्याकडून ७ लाख रुपये उधार घेतले होते. या उधारीमुळे त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. अशात एक दिवस हा वाद विकोपाला गेला आणि नराधमाने महिलेची हत्या केली आहे. १२ मे रोजी ही धक्कायक घटना घडली आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती अशी दिली आहे की, जेव्हा ही घटना समोर आली तेव्हा त्यांनी आरोपीची कसून चौकशी केली. या चौकशीत समजले की, आरोपी त्याच्यावर संशय येऊनये म्हणून महिलेच्या नातेवाईकांना फोनवर सांगत राहिला की महिला जीवंत आहे. ती कामानिमित्त दुसरीकडे गेली आहे. अशा पद्धतीने त्याने महिलेच्या नातेवाईकांना अंधारात ठेवलं.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.