Gold Silver Price Hike : सोनं 62 हजार पार ! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार अधिक पैसे, तपासा तुमच्या शहरातील दर

Gold Silver Rate In Maharashtra : काल सोन्याच्या दराने 61 हजारांचा आकडा पार केला होता तर आज सोन्याने 62 हजारांचा आकडा पार केला आहे.
Gold Silver Price Hike
Gold Silver Price HikeSaam Tv

Sona Chandi Bhav : लग्नसराईच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दरात सात्तत्याने वाढ होत आहे. काल सोन्याच्या दराने 61 हजारांचा आकडा पार केला होता तर आज सोन्याने 62 हजारांचा आकडा पार केला आहे.

राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत (Price) 61430 रुपये होते. तर 999 शुद्धतेची चांदी 76,351 रुपये आहे.

Gold Silver Price Hike
Gold Silver Price Hike : सोनं महागलं ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

गुड रिटर्न्स या  वेबसाइटनुसार (Website)  22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,100 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,280 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 780 रूपये आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price update 11th May 2023)

काल सकाळच्या दरानुसार सोन्याच्या 22 कॅरेटसाठी ४०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे तर 24 कॅरेटसाठी ४३० रुपये आज अधिक मोजावे लागणार आहे.

Gold Silver Price Hike
Gold Silver Price Hike : सोनं पुन्हा महागलं ! १ ग्रॅम सोन्यासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, तपासा आजचे दर

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,590 रुपये

दिल्ली - 62,280 रुपये

हैदराबाद - 62,130 रुपये

कोलकत्ता - 62,130 रुपये

लखनऊ - 62,280 रुपये

मुंबई -62,130 रुपये

नागपूर - 62,130 रुपये

पुणे - 62,130 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,700 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,850 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदीचा दर 781 रूपये आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. (Gold Silver Price update 10th May 2023)

Gold Silver Price Hike
Diabetes Causes : साखरेमुळे नाही तर या पदार्थांमुळे जडतो मधुमेह...

3.   हॉलमार्कचे (Hallmark)  सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com