Gold Silver Price Down : सुवर्णसंधी ! आठवड्याभरात सोनं झाले स्वस्त, तपासा 24 ग्रॅम सोन्याचे दर

Gold Silver Price In Maharashtra : सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे.
Gold Silver Price Down
Gold Silver Price Down Saam Tv

Weekly Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. परंतु, सोने आजही ६१ हजारांवरच आहे. काल सोन्याचे दर 61,037 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होते.

त्याच वेळी, 5 मे 2023 रोजी, गेल्या आठवड्यातील शुक्रवारी सोन्याचा (Gold) भाव 61,739 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. या आठवडाभर सोन्याच्या दरात चढ-उतार दिसून आले.

Gold Silver Price Down
Gold Silver Price Down : सुवर्णसंधी ! सोन्याच्या दरात घसरणं; तर चांदीही झाली स्वस्त, तपासा आजचे दर

1. आठवडाभरात सोन्याचा भाव कसा होता?

IBJA च्या दरांनुसार, या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याचा भाव 61,108 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मंगळवारी किमतींमध्ये किंचित वाढ झाली आणि ती प्रति 10 रुपये 61,370 वर पोहोचली. बुधवारी सोन्याचा भाव 61,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. गुरुवारी सोन्याचा दर 61,539 रुपयांवर (Money) येऊन थांबला. शुक्रवारी किमती घसरल्या आणि 61,037 रुपयांवर बंद झाला. आठवडाभऱ्यात सोन्या-चांदीच्या भावात चढ उतार पाहायला मिळाले.

Gold Silver Price Down
Gold Silver Price Hike : सोनं 62 हजार पार ! 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार अधिक पैसे, तपासा तुमच्या शहरातील दर

2. सोने किती रुपयांनी स्वस्त झाले ?

मागच्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचा भाव 61,739 रुपयांवर येऊन थांबला. तर या आठवड्यात सोन्याच्या दरात ७०२ रुपयांनी घट झालेली पाहायला मिळाली. या आठवड्यात सोन्याचे दर दर 61,539 रुपयांवर येऊन थांबला. शुक्रवारी किमती घसरल्या आणि 61,037 रुपयांवर बंद झाला

3. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com