Petrol Diesel Prices Today : प्रेट्रोल-डिझेलचे दर जाहीर; या शहरांमध्ये वाढल्या किंमती

Petrol Diesel Prices : नोएडासह गाजियाबाद आणि NCR च्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत.
Petrol Diesel Prices
Petrol Diesel Prices Saam TV

Petrol Diesel Rates: जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत काही प्रमाणात घसरण दिसत आहे. मात्र तरी देखील अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. जागतिक बाजारात सध्या क्रूडची किंमत ७५ डॉलर इतकी आहे.अशात आज सकाळी ६ वाजता सकारी तेल कंपन्यांनी कच्चा तेलाच्या किंमती जाहीर केल्यात. नोएडासह गाजियाबाद आणि NCR च्या अनेक शहरांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढले आहेत. (Latest Petrol Diesel Rates)

सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या कच्चा तेलाच्या किंमतींमध्ये बराच बदल दिसत आहे. गौतमबुद्ध नगरमध्ये आज पेट्रोल २४ पैशांनी महागलं आहे. तर डिझेल २१ पैशांनी महागलं आहे. पेट्रोल ९७ रुपये तर डिझेल ९०.१४ रुपये प्रति लिटरने मिळत आहे.

Petrol Diesel Prices
Petrol Diesel Price Today: कच्चा तेलाचे नवीन दर जाहीर; वाचा तुमच्या शहरात कितीने महागलं पेट्रोल-डिझेल

गाझियाबादमध्ये पेट्रोल १४ तर डिझेल १३ पैशांनी महागलं आहे. येथे पेट्रोल ९६.५८ रुपये तर डिझेल ८९.७५ रुपये प्रति लिटरने मिळत आहे. लखनऊमध्ये ही पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. येथे पेट्रोल ५ पैशांनी महागले असून ९६.६२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ५ पैशांनी वाढले असून ८९.८१ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. आज नोएडा, गाझियाबाद आणि लखनऊ या शहरांमध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे दर वाढले आहेत.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Prices
Viral Video: खरंच ना भावा! वाघाची शिकार हरणीने केली; सत्य घटनेचा VIDEO व्हायरल

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल. (Petrol Diesel Price)

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com