
कराची: पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची खुर्ची गमावल्यानंतर आता इम्रान खान (Imran Khan) एका नव्या वादात सापडले आहेत. इम्रान खान यांच्यावर परदेशातून सरकारला मिळालेल्या भेटवस्तू दुबईत विकल्याचा आरोप होत आहे. पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ (Pakishan PM Shahbaz Sharif) यांनी सुद्धा खुलासा केला की, माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकारी तिजोरीतून भेटवस्तू दुबईला नेल्या आणि तेथे त्या १४ कोटी रुपयांना विकल्या. इमरान खान यांनी सरकारी भेटवस्तू विकल्याचं समोर आल्यानं पाकिस्तानातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. इतकंच नाही तर, इम्रान खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आदर्श घ्यावा, असा सल्ला देखील दिला जात आहे.
तोशाखान्यातील सरकारी भेटवस्तू विकून कोट्यवधी रुपये कमावल्याप्रकरणी पाकिस्तानचे लोक इम्रान खान यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहे. इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा यांनी परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू विक्रीप्रकरणी विरोधक आक्रमक झाले आहेत. इतकंच नाही तर पाकिस्तानातील नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज खान यांनी इमरान खान यांच्याकडे भेटवस्तूंच्या विक्रीचा हिशोब मागितला आहे. पंतप्रधानपदी कार्यरत असताना इमरान खान यांना सरकारी मानधन म्हणून १४ कोटी १० लाख रुपये मिळाले होते. तर, भेटवस्तू विक्रीतून त्यांना १४ कोटी २० लाख मिळाले होते.
पाकिस्तानच्या कायद्यानुसार दुसऱ्या देशांच्या पाहुण्याकडून मिळालेल्या भेटवस्तू तोशाखान्यात ठेवल्या पाहिजेत. मात्र इम्रान यांनी या भेटवस्तू दुबईत १४ कोटींमध्ये विकल्या. याच गोष्टीचा राग मनात धरत पाकिस्तानातील जनतेनं सोशल मीडियावर मोदींचा एक व्हिडिओ व्हायरल करत इम्रान यांनी मोदींचा आदर्श घ्यावा असा सल्ला दिला आहेत. काही दिवसांपूर्वी, या प्रकरणावर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने म्हटले होते की, इतर देशांच्या सरकारांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिलेल्या भेटवस्तू या देशाच्याच असतात. यावर उत्तर देताना इम्रान खान म्हणाले होते की, त्या भेटवस्तू माझ्याच असल्याने त्या आपल्याजवळ ठेवण्याचा किंवा विकण्याचा पूर्ण अधिकार मला आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी नेटिझन्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेअर केलेला व्हिडिओ हा २०१८ सालचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भारत की बात' या कार्यक्रमात भारतीयांशी संवाद साधला होता. लंडनमधील वेस्टमिन्स्टर सेंट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला होता. या व्हिडिओत नरेंद्र मोदी म्हणतात की, गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मला सोने आणि चांदीच्या भेटवस्तू मिळायच्या पण मी त्या घेत नसे. त्या भेटवस्तू आपण सरकारी खजिन्यात जमा करत असल्याचं मोदी म्हणत आहे. पुढे त्या भेटवस्तूंचा लिलाव सुरु केला होता. त्यातून मिळणारे पैसे मी मुलींच्या शिक्षणासाठी दिल्याचं मोदींनी म्हटल्याचा त्या व्हिडीओत उल्लेख आहे. नरेंद्र मोदींनी त्या व्हिडिओत १०० कोटी रुपये मुलींच्या शिक्षणासाठी दिल्याची माहिती दिली आहे.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.