Libya Flood: लिबियात विनाशकारी पूर; ५ हजार ३०० जणांचा मृत्यू, सुमारे 10 हजार लोक बेपत्ता

Flood in Libya: भूमध्यसमुद्रात आलेल्या डेनियनल वादळामुळे पूर आल्याची घटना घडली. या नैसर्गिक आपत्तीत ५ हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे.
Libya Flood
Libya FloodSaam Tv

Flood in Libya:

लिबियाच्या समुद्रात आलेल्या डेनियनल वादळामुळे डेरना शहरात आलेल्या पुरानं मोठं नुकसान झालंय. या पुरात ५ हजार ३०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झालाय. तर १० हजार पेक्षा अधिक जण बेपत्ता झाले आहेत. याविषयीची माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद अबू- लामोशा यांनी दिलीय. रविवारीच्या दिवशी वादळामुळं समुद्राचं पुराचं पाणी संरक्षण बांध तोडत शहरात घुसलं आणि संपूर्ण शहर पाण्यात वाहून गेलं. मिळालेल्या माहितीनुसार, डेरनामध्ये आतापर्यंत १५०० मृतदेह मिळाली आहेत. तर मृतांचा आकडा अजून वाढण्याचा अंदाज आहे. (Latest News )

आंतरराष्ट्रीय संस्था रेड क्रास आणि रेड क्रिंसेट सोसायटीनुसार, पुरामुळं १० हजार जणं बेपत्ता झाले आहेत. आपत्ती निवारण मंत्रालयाचे मंत्री हिचेम चिकीओत यांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरनाच्या विनाशकारी पूर मी पाहिलं. चहुबाजुला मृतदेह पडले आहेत. रुग्णालयात मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. हानी होण्याची संख्या निश्चितच जास्त असणार आहे. चिकीओतनुसार, मृतांची संख्या वाढू शकते.

कारण बेपत्ता होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. शहराला नुकसानग्रस्त परिसर घोषित करण्यात आलंय. पूर्व भागाकडील लिबियाच्या शहरातील अनेक घरांचं नुकसान झालंय. भूमध्यसमुद्रात आलेल्या डेनियनल वादळामुळे पूर आल्याची घटना घडली. या वादाळामुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यावरील संरक्षण बंधारे तोडत शहरात घुसलं.

लिबियामध्ये असलेल्या अमेरिकनं विशेष दूत रिचर्ड नार्टन यांनी सांगितलं की, आम्ही यूएन भागीदारांच्या समन्वयाने लिबियाला मदत पाठवत आहोत. इजिप्त, कतार, इराण आणि जर्मनीनेही पूरग्रस्त लिबियाला मदत पाठवण्याचं सांगितलं आहे.

Libya Flood
Vietnam Fire : भयंकर ! व्हिएतनामध्ये इमारतीला भीषण आग, ५० रहिवाशांचा होरपळून मृत्यू

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com