Breaking: LJPचे खासदार प्रिन्स राज, यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

FIRमध्ये चिराग पासवान यांच्याही नावाचा समावेश आहे.
Breaking: LJPचे खासदार प्रिन्स राज, यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
Breaking: LJPचे खासदार प्रिन्स राज, यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखलSaam Tv

नवी दिल्ली: तीन महिन्यांपूर्वी एका महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे बिहारमधील समस्तीपूरचे एलजेपी खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी बलात्कार, गुन्हेगारी कट, पुरावे नष्ट करण्याशी संबंधित आयपीसी तरतुदींनुसार एफआयआर नोंदवला आहे . एफआयआरमध्ये एलजेपीचे नेते चिराग पासवान यांचही नाव आहे, ज्यांनी तक्रारीत आरोप केला आहे की, त्यांनी त्यांचा चुलत भाऊ प्रिन्सविरुद्ध कारवाई लांबवण्याचा कट रचला.

Breaking: LJPचे खासदार प्रिन्स राज, यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
बुलढाणा: अतिवृष्टीने 18 गावातील 950 शेतकऱ्यांचे 600 हेक्टर चे नुकसान

तक्रारदाराने संपर्क साधल्यानंतर दिल्ली कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी 9 सप्टेंबर रोजी एफआयआर दाखल केला. या वर्षी जूनमध्ये पक्षात चिराग पासवान यांच्याविरुद्द बंड करणाऱ्या पाच एलजेपी खासदारांपैकी प्रिन्स एक आहे. 10 फेब्रुवारी रोजी प्रिन्स यांनी तक्रारदारा विरोधात खंडणीचा एफआयआर दाखल केलीा होता. “माझ्या माहितीत आले आहे की एका महिलेने माझ्यावर काही आरोप केले आहेत. आम्ही 10 फेब्रुवारीलाच तक्रार दाखल केली होती आणि सर्व पुरावे पोलिसांसमोर सादर केले होते, ” असे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. i

17 जून रोजी त्यांनी ट्विट केले होते की, “माझ्याविरुद्ध करण्यात आलेला कोणताही दावा मी स्पष्टपणे नाकारतो. हे सर्व दावे खोटे, बनावट आहेत आणि माझ्यावर व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या माझ्या प्रतिष्ठेला धोका देऊन माझ्यावर दबाव आणण्याच्या मोठ्या गुन्हेगारी षडयंत्राचा भाग आहे”. तक्रारदाराचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या वकील सुदेश कुमारी जेठवा यांनी माध्यमांना सांगितले, “आम्ही मे महिन्यात दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि जुलैमध्ये दिल्ली न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने पोलिसांना राजकुमार राज आणि त्याचा चुलत भाऊ चिराग पासवान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com