खळबळजनक! भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या

उत्तर प्रदेशच्या बागपत मध्ये भाजपा नेत्याची राहत्या घरामध्येच गळादाबून हत्या
खळबळजनक! भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या
खळबळजनक! भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्याSaam Tv

उत्तर प्रदेशच्या बागपत मध्ये भाजपा नेत्याची राहत्या घरामध्येच गळादाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री राहिलेल्या आत्मराम तोमर यांची हत्या करण्यात आली आहे. आत्मराम तोमर यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरामधेच सापडला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमकरिता पाठविण्यात आला आहे. अधिक तपासाला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

हे देखील पहा-

बडौतच्या बिजरौल रोड या ठिकाणी आत्माराम तोमर यांचे निवासस्थान आहे. टॉवेलचा वापर करुन, आत्माराम तोमर यांचा गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाज पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार त्यांची कार देखील गायब झाली आहे. तोमर यांचा ड्रायव्हर विजय सकाळी जेव्हा तोमर यांच्या घरी पोहोचला, तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि कार जागेवर नव्हती.

खळबळजनक! भाजपा नेते आत्माराम तोमर यांची गळादाबून हत्या
जुन्या वादातून युवकाची हत्या; दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर बेडवर तोमर यांचा मृतदेह होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर टॉवेल पडलेला होता. यानंतर ड्रायव्हरने तात्काळ पोलिसांना पाचारण केले आहे. आत्माराम तोमर जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक राहिले आहेत. त्यांनी १९९३ साली छपरौली या ठिकाणी विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक देखील लढवली होती आणि १९९७ साली भाजपाने त्यांना मंत्रिपद देखील दिले होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com