Viral News : तरुणीच्या उंचीपेक्षा केसच लांब, चालताना पायाखाली येतात; जाणून घ्या काय आहे वाढत्या केसाचे रहस्य?

पाच फुटाच्या तरुणीचे केस हे तिच्या उंची पेक्षा लांब आहेत.
Malgorzata Kulczyk
Malgorzata KulczykInstagram

How to Make Your Hair Grow Long and Stronger tips : अनेक तरुणींना आपले केस हे दाट, काळेभोर आणि लांब असावे अशी इच्छा असते. मात्र, ज्यांचे केस हे फार लांब असतात, त्यांच्यासाठी केसाची काळजी घेणं मोठं आव्हान असतं. अशाच प्रकारच्या केसाची काळजी घेणारी तरुणी सध्या चर्चेत आहे. पाच फुटाच्या तरुणीचे केस हे तिच्या उंची पेक्षा लांब आहेत. माल्गोर्जेटा कुल्सकीक (Malgorzata Kulczyk) असे लंडनमधील राहणाऱ्या तरुणीचे नाव आहे. (Latest Marathi News)

३५ वर्षांची माल्गोर्जेटा कुल्सकीकच्या केसाची (Hair) लांबी ही ५.२ फूट आहे. माल्गोर्जेटाने तिचे केस कधीही न कापण्याचा निर्णय घेतला आहे. एका युट्यूब चॅनलशी संवाद संवाद साधताना माल्गोर्जेटा म्हणाली, 'माझे केस हे माझ्यापेक्षा लांब आहे. माझं वय वर्ष ७ होतं, तेव्हापासून मला लांब केसाची आवड आहे. आज माझे केस हे पाच फुटापेक्षा लांब झाले आहेत. लांब केसामुळे अनेक जण माझं कौतुक करतात. विशेष महिलांकडून अधिक कौतुक होतं'.

स्कॅल्प मसाज करत असताना माल्गोर्जेटा म्हणते, 'स्कॅल्प मसाजमुळे मला केस वाढवण्यास मदत होते'. तिच्या हेयरड्रेसरने सांगितले की, 'माल्गोर्जेटाचे केस मऊ आणि लांब आहेत. तसेच तिचे केस खूप स्वच्छ आहेत'.

माल्गोर्जेटाला नेहमी तिचे केस बांधून ठेवायला आवडतात. मात्र, सोशल मीडियावर नेहमी केस मोकळे करून फोटो शेअर करते.

'लांब केसासाठी संयम आवश्यक आहे. हे केवळ एका दिवसाचं काम नाही. केसाची वाढ होण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या तेलाचा वापर करू शकता. उदा. नारळाचं तेल. तसेच तुम्ही केसाचा मसाज देखील करू शकता. केमिकलयुक्त पदार्थ टाळा. चांगला आहार घ्या. हायड्रेटेड रहा. व्यायाम करा. तणावापासून दूर रहा', असा माल्गोर्जेटा सल्ला देते.

Malgorzata Kulczyk
Viral Video : पाळीव कुत्रा आणि युवकाचा अनोखा दोस्ताना; खांद्यावर बसवून चालवतो शहरभर सायकल , व्हिडिओ व्हायरल

माल्गोर्जेटा ही घरात तयार केलेल्या उत्पादनांचा वापर करते. त्याचा वापर ती आंघोळ करण्याच्या अर्धा तास करते. माल्गोर्जेटा ही केवळ आठवड्यातून तीन वेळा केस धुते. सोशल मीडियावर तिच्या लांब केसामुळे प्रसिद्ध झाली आहे .

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com