रिस्‍क हैं तो इश्‍क हैं!; गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पठ्ठ्या अख्ख्या गावची लाइट घालवायचा
Love Affair Latest News in MarathiSAAM TV

रिस्‍क हैं तो इश्‍क हैं!; गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी पठ्ठ्या अख्ख्या गावची लाइट घालवायचा

सरकारी शाळेत प्रेमीयुगुलाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडल्यानंतर पुढे जे घडलं ते चक्रावून टाकणारे होते.

पूर्णिया (बिहार): एका प्रेमवीराचा 'कारनामा' उघड झाल्यानंतर अख्खा गावच चक्रावून गेला आहे. आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी इलेक्ट्रिशियन असलेला तरूण अख्ख्या गावचा वीज पुरवठा खंडित करत असल्याचे उघड झाले आहे. ज्या-ज्या वेळी तो तरूण गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जायचा, त्या-त्या वेळी संपूर्ण गावचा वीज पुरवठा खंडित करत होता. बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूर गावात हा प्रकार घडला आहे.

गणेशपूरमधील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असे. मात्र, यामागचे कारण गावकऱ्यांना सुरुवातीला माहीत नव्हते. नेहमी दोन ते तीन तास वीज गायब होत असल्याने गावकरी त्रासले होते. पण वीज पुरवठा खंडित होण्यामागचे कारण समजल्यानंतर गावकऱ्यांना धक्काच बसला. इलेक्ट्रिशियन तरूण आपल्या गर्लफ्रेंडला चोरून भेटण्यासाठी अख्ख्या गावचा वीजपुरवठा खंडित करत होता. या तरुणाचा 'प्रताप' गावकऱ्यांनीच उघडकीस आणला.

दरदिवशी संध्याकाळी दोन ते तीन तास गावातील वीज गुल व्हायची. अख्खा गाव या वेळेत अंधारात असायचा. दुसरीकडे शेजारच्या गावात विजेचा लखलखाट असायचा. त्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होत नव्हता. या त्रासाला गावकरी वैतागले होते. पण जेव्हा यामागचे खरे कारण समोर आले तेव्हा गावकरी हादरूनच गेले.

Love Affair Latest News in Marathi
समलिंगी मैत्रिणींमध्ये जडलं प्रेम; लग्नासाठी घरातूनही पळाल्या, पण शेवटी आलं वेगळंच वळण

मिळालेल्या माहितीनुसार, वीज का गायब होते याचे कारण शोधण्यासाठी गावकऱ्यांनी योजना आखली. वीजपुरवठा कोण खंडित करतो, त्याला नेमके शोधायचे होते. पुढच्या वेळी वीज पुरवठा खंडित झाला. गावकऱ्यांनी ठरल्याप्रमाणे 'सापळा' रचला. जवळपास सगळेच गावकरी गावातील सरकारी शाळेत गेले. त्यावेळी इलेक्ट्रिशियन तरूण गावकऱ्यांच्या तावडीत सापडला. त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड देखील होती.

गावकऱ्यांनी गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर या प्रेमवीराचं मुंडन करून धिंड काढली. गर्लफ्रेंडला रात्रीच्या अंधारात चोरून भेटता यावं यासाठी आपण अख्ख्या गावचा वीज पुरवठा खंडित करायचो, अशी कबुली या प्रेमवीरानं दिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनीही या प्रेमीयुगुलाचे गावचे सरपंच आणि सदस्यांच्या उपस्थितीत लग्न लावून दिले. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची माहिती आम्हाला मिळाली. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार आम्हाला मिळालेली नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.