सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट, जाणून घ्या नवे दर

हे नवे दर आज सकाळी 6 पासून लागू झाले आहेत.
LPG Gas Cylinder Prices
LPG Gas Cylinder Prices Saam Tv

नवी दिल्ली - ऑगस्ट महिन्याची सुरुवात होताच गॅस वितरण कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. कंपन्यांकडून सोमवार, 1 ऑगस्ट 2022 रोजी एलपीजी सिलिंडरच्या (Cylinder) किंमती कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, ही कपात केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरवर आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार, आज व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये 36 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राजधानी दिल्लीत (Delhi) 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1,976 रुपये होणार आहे. हे नवे दर आज सकाळी 6 पासून लागू झाले आहेत.

एलपीजी सिलिंडरच्या किंमती प्रत्येक महिन्याच्या एका तारखेला निश्चित केल्या जातात. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीही कमी करण्यात आल्या होत्या. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

हे देखील पाहा -

घरगुती एलपीजी सिलेंडरबद्दल बोलायचे झाले तर सध्या दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1053 रुपये आहे. यापूर्वी 19 मे रोजी या किंमतीत बदल करण्यात आला होता. त्यानंतर घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमती 1003 रुपयांवरून 1053 रुपये करण्यात आल्या होत्या. सध्या कोलकात्यात घरगुती एलपीजीची किंमत 1079 रुपये, मुंबईत 1052 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आहे.

LPG Gas Cylinder Prices
Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? जाणून घ्या आजचे दर

एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या असताना दुसरीकडे घरगुती गॅसवर मात्र जनतेला कोणताही दिलासा नाही. जुलैपर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकली तर या वर्षी आतापर्यंत दिल्लीत १४.२ किलो विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती चार वेळा वाढवण्यात आल्या आहेत. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत, 14.2 किलो विनाअनुदानित गॅस सिलिंडरची किंमत ऑगस्ट 2021 मध्ये प्रति सिलिंडर 859 रुपये होती, जी आजच्या तारखेनुसार 1,053 रुपयांवर गेली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com