ईद अन् अक्षय्य तृतीयेला रस्त्यावर कोणताही कार्यक्रम होऊ नये; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचना

अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सर्व धर्मगुरूंशी चर्चा करण्याचे निर्देश दिले.
ईद अन् अक्षय्य तृतीयेला रस्त्यावर कोणताही कार्यक्रम होऊ नये; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचना
Yogi Aditynath Latest Marathi News, Uttar Pradesh Latest News Saam Tv

लखनौ: ३ मे रोजी एकाच दिवशी तीन सण आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ खूप गंभीर आहेत. मंगळवारी, अक्षय्य तृतीया, ईद आणि परशुराम जयंती दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी अधिकार्‍यांना राज्यात कोणतीही अनुचित घटना घडल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सर्व धर्मगुरूंशी चर्चा करण्याचे निर्देश दिले असून, कुठेही रास्त्यावर धार्मिक कार्यक्रम होऊ नयेत, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. (Yogi Aditynath Latest Marathi News)

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) म्हणाले की, ३ मे रोजी ईद, परशुराम जयंती आणि अक्षय्य तृतीया हे पवित्र सण आहेत. राज्यातील सध्याचे वातावरण पाहता पोलीस आणि प्रशासनाला अधिक संवेदनशील राहावे लागणार आहे. प्रत्येक सण शांततेत आणि एकोप्याने पार पडावा यासाठी स्थानिक गरजांनुसार आवश्यक ते सर्व प्रयत्न करा. धार्मिक कार्यक्रम, पूजा इत्यादी ठरलेल्या ठिकाणीच व्हावेत, असे ते म्हणाले. सर्वत्र धर्मगुरूंशी संवाद साधा आणि रस्ता आणि वाहतूक विस्कळीत होऊन कोणताही धार्मिक कार्यक्रम होणार नाही याची काळजी घ्या.

Yogi Aditynath Latest Marathi News, Uttar Pradesh Latest News
...म्हणून राज ठाकरे पवारसाहेबांवर टीका करतात; सुरेखा पुणेकरांची बोचरी टीका

अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती आणि ईदच्या निमित्ताने राज्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा. कोठेही अनावश्यक वीज बंद करु नका. यासोबतच सर्व धार्मिक स्थळांच्या आजूबाजूला स्वच्छता, पिण्याचे पाणी आदींची व्यवस्था करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. लोकांच्या सोयीची काळजी घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राज्यातील जातीय वातावरण अधिक चांगले झाले आहे. राज्यातील प्रत्येक सण शांततेत पार पडला पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. असंही योगी (Yogi Adityanath) म्हणाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.