होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल केला, बोलता बोलता महिला कॉन्स्टेबलनं संपवलं जीवन

Lucknow Police : सरिता 11 जानेवारी 2022 पासून पीजीआय पोलिस स्टेशनमध्ये तैनात होत्या
Sarita Nishadh
Sarita NishadhSaam Tv

लखनऊ : लखनऊमध्ये (Lucknow) एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Woman police constable suicide) केला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एकता नगरमध्ये राहणाऱ्या सरिता निषाद (Sarita Nishadh) यांनी गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरिता लखनऊच्या पीजीआय पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. (Lucknow Police Constable Sarita Nishadh committed suicide by hanging self)

Sarita Nishadh
धक्कादायक! पबजी खेळण्यात गुंतला अन् थेट इमारतीवरून खाली पडला

प्राथामिक माहितीनुसार, सरिता सुरेंद्र चंद्र या कोतवाली पोलीस ठाण्यात अंतर्गत येणाऱ्या एकता नगरमध्ये लाईनमध्ये वास्तव्यास होत्या. आपल्या मैत्रिणींसोबत त्या तिथे राहत होत्या. सरिता यांचे लग्नही ठरले होते. रविवारी दुपारच्या सुमारास त्या आपल्या होणाऱ्या पतीसोबत फोनवर बोलत होत्या. तेव्हा दोघांमध्ये काही वाद झाला आणि सरिता यांनी अगोदर हाताची नस कापली. इतक्यावरच न थांबता त्यांनी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

यादरम्यान, सरिता यांच्या मैत्रिणी घरी आल्या. दार ठोठावून सुद्धा सरिता दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून बघितलं असता, त्यांना सरिता यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सरिता यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

Sarita Nishadh
४ वर्षे प्रेमप्रकरण आणि नंतर लग्न; पहिल्याच दिवशी नवरी म्हणाली...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ फतेहाबाद येथे राहणाऱ्या सरिता सुरेंद्र चंद्र यांची 2021 मध्ये कॉन्स्टेबल पदावर निवड झाली होती. सरिता 11 जानेवारी 2022 पासून पीजीआय पोलिस स्टेशनमध्ये तैनात होत्या. त्यांच्यासोबत इतर महिला कॉन्स्टेबल सुद्धा राहत होत्या. रविवारी सरिता यांच्या सहकारी जेव्हा दुपारच्या सुमारास घरी आल्या तेव्हा सरिता यांनी दार उघडले नाही. त्यामुळे खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना सरिता यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.

दरम्यान, याची माहिती त्यांनी तातडीने पोलिसांना दिली. सरिता यांनी सुरूवातीला हाताची नस कापली. त्यानंतर ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. घटनास्थळावरून सरिता यांचा मोबाईल जप्त करण्यात आला असून, त्या व्हिडिओ कॉलची चौकशी करण्यात येत आहे. त्याचबरोबर आत्महत्येचे कारणही तपासले जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com