MP Road Accident: भीषण अपघात! प्रवासी बसला ट्रॉलीची धडक, ५ जणांचा मृत्यू; 15 जखमी

Madhya Pradesh Accident News: मृतांमध्ये एकाच घरातील तिघांचा समावेश असून ते सर्वजण लग्नासाठी अहमदाबादला जात होते, त्याचवेळी काळाने घाला घातला...
MP Road Accident
MP Road AccidentSaamtv

Shajapur Accident: मध्यप्रदेशमध्ये एक भीषण अपघाताची बातमी सध्या समोर येत आहे. मध्य प्रदेशातील शाजापूरमध्ये बुधवार-गुरुवारी मध्यरात्री झालेल्या भयंकर अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तब्बल १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

MP Road Accident
Nandurbar News: योग्य भाव मिळत नसल्याने कांदा रेल्वेने जम्मू कश्मीरकडे; खासदार डॉ. गवितांनी काढला तोडगा

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, कानपूरहून एक खासगी बस अहमदाबादकडे निघाली होती. ज्यामध्ये एक कुटूंब नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जात होते. बसमध्ये सर्व बसच्या पुढच्या सीटवर बसले होते. शाजापूरच्या (Madhya Pradesh) माकसी येथे आल्यानंतर या बसचा आणि ट्रॉलीचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून जखमींची प्रकृती गंभीर आहे.

दुर्देवी बाब म्हणजे, अपघातात एकाच घरातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी भीषण होती की बसची एक बाजू पुर्णपणे उद्धस्त झाली. त्यामुळे पुढे बसलेल्या प्रवाशांना जीव वाचवता आला नाही. (Latest Marathi News)

MP Road Accident
Satara Rasta Roko Andolan News : स्वच्छ पाणीपूरवठ्यासाठी शेकडाे सातारकरांनी राेखला माेती चाैक

घटनेची माहिती मिळताच मॅक्सी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 3 च्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. ज्यामध्ये बसला ट्रॉलीने जोरदार धडक दिली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ज्यांना पोलिसांनी उपचारासाठी उज्जैनला पाठवले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com