भीक मागून पत्नीसाठी खरेदी केली मोपेड बाईक; भिकाऱ्याचं पत्नीप्रेम पाहून थक्क व्हाल

Madhya Pradesh Beggar Bike News : एका भिकाऱ्याला मोपेड का विकत घ्यावी लागली? आणि त्यासाठी पैसे कुठून आले याची कथा खूप गोड आणि मनोरंजक आहे.
beggar buys bike for his wife
beggar buys bike for his wifeTwitter/ @ANI

मुंबई: पती आणि पत्नी यांचं नातं हे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना असंच असतं. पती आणि पत्नी (Wife) हे आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन लग्नाच्या वेळी देत असतात. एकमेकांची काळजी घेणं यातूनच ते आपलं प्रेम व्यक्त करतात. याला भिकारीही (Beggar) अपवाद नाही. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडा (Chhindwara) येथे अशीच एक घडली आहे. (Madhya Pradesh Beggar Purchase Bike For His Wife)

हे देखील पाहा -

भिकाऱ्याने पत्नीसाठी घेतली ९० हजारांची मोपेड बाईक

मध्य प्रदेशमधील एका भिकाऱ्याने भिक मागून जमा केलेल्या पैशांनी चक्क एक मोपेड बाईक (Mophed Bike) विकत घेतली आहे. या मोपेडवर संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी हे जोडपे भीक मागून आपलं पोट भरतात. दोघेही एकाच मोपेडने भीक मागण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. पण एका भिकाऱ्याला मोपेड का विकत घ्यावी लागली? आणि त्यासाठी पैसे कुठून आले याची कथा खूप गोड आणि मनोरंजक आहे.

म्हणून पत्नीला गिफ्ट केली तब्बल ९० हजारांची मोपेड बाईक

खरंतर ही मोपेड संतोषने त्याची पत्नी मुन्नीला भेट म्हणून दिली आहे. संतोष हा दोन्ही पायांनी अपंग आहे. त्याने सांगितले की, त्याच्याकडे पूर्वी एक ट्रायसायकल होती, त्यावर दोघे मिळून ट्रायसायकलवरून भीक मागायचे. बायकोला पायीच ट्रायसायकल ढकलायची होती आणि त्यावर बसल्यामुळे मुन्नीला पाठदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती आजारी पडली आणि संतोषला तिच्या उपचारासाठी संतोषला ५० हजार रुपये खर्च करावे लागले. यानंतर संतोषने जवळपास ४ वर्ष एक-एक पैसा जोडला आणि पैसे जमा केले. आता पत्नीला वृद्धापकाळात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून त्याने ही मोपेड बाईक तब्बल ९० हजार रुपयांना विकत घेतली आहे. आता दोघेही या मोपेडवरून मध्यप्रदेशच्या सिवनी, इटारसी, भोपाळ आणि इंदूर या शहरांत भिक मागण्यासाठी जातात.

beggar buys bike for his wife
प्रेयसीसोबत संबंध ठेवताना प्रियकराचा मृत्यू, मुंबईतील धक्कादायक घटना

मोपेड खरेदी केल्यानंतर संतोषने त्याला मदत करणाऱ्यांना मिठाईही खाऊ घातली. भिकारी जोडप्याची ही अनोखी प्रेम कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भिकाऱ्याने मोपेड विकत घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटत आहे, तर अनेकांना यात केवळ एका पतीचे आपल्या पत्नीवर असलेलं अपार प्रेम दिसून येत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com