धक्कादायक! मुलाने आईलाच प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; त्यानंतर घडलं भयंकर

Shajapur Crime : मृत मुलाची आई ममता हिचे उज्जैन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबध होते.
Shajapur Crime
Shajapur CrimeSaam Tv

शाजापूर : मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) शाजापूर तालुक्यातील अकोदिया गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. प्रेमात अडसर ठरणाऱ्या 12 वर्षीय मुलाचा वाढदिवसाच्याच दिवशी आईनं प्रियकराच्या मदतीने खून केल्याचं समोर आलं आहे. वरुन कैलास सुर्यवंशी (वय 12) ममता कैलास सुर्यवंशी (वय 38) आणि तिचा प्रियकर संजय बामनिया (वय 23) अशी आरोपींची नावे आहेत.

Shajapur Crime
लाऊडस्पीकर आरती लावण्याने तुंबळ हाणामारी; तरुणाची हत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाजापूर (Shajapur) तालुक्यातील अकोडिया गावातील शेतशिवारात 3 मे रोजी त्यांना एका 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला होता. प्राथामिक तपासणीनंतर मुलाची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना (MP Police) होता. तर दुसरीकडे कैलास सुर्यवंशी यांनी आपला मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला.

पोलिसांनी सुर्यवंशी यांच्या शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता, मृत मुलाची आई ममता हिचे उज्जैन येथे राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबध होते. संबधित व्यक्ती हा दररोज ममताच्या घरी येत जात असे अशी माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनंतर, पोलिसांनी उज्जैन येथून संजय नामक व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने वरुनच्या हत्येबाबत संपूर्ण रहस्य उघड केले.

Shajapur Crime
नवरदेव दारुच्या नशेत दिसताच नवरी संतापली; भर मंडपात सिनेस्टाईल हाणामारी

वरुणचे वडील कैलास सूर्यवंशी फळे विकण्याचा व्यवसाय करतात. वरुण आणि त्याची मोठी बहिण अंजली दिवसभर आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करतात. मात्र 3 मे रोजी वरुणचा वाढदिवस होता. त्यामुळे तो लवकर घरी आला. दरम्यान, घरी आल्यानंतर त्याने आपल्या आईला प्रियकर संजयसोबत नको त्या अवस्थेत बघितलं. त्यानंतर मुलगा आपली सर्व हकीकत वडिलांना सांगेल म्हणून ममता अतिशय घाबरली. तिने वरुणला जवळ बोलवत त्याचे उशीने तोंड दाबले आणि हत्या केली. हत्येनंतर निर्लज आई ममताने आपल्या प्रियकरासोबत घटनास्थळीच शय्या केली.

त्यानंतर ममताने प्रियकराच्या साथीने वरुणचा मृतदेह गोणीत भरून दूर शेतात नेऊन टाकला. जेव्हा वरुणची बहिण आणि त्याचे कैलास सूर्यवंशी घरी आले तेव्हा त्यांनी ममताला वरुणविषयी विचारले. तर वरुण घरी आला होता पण तो मित्रांसोबत बाहेर खेळायला गेला असे सांगत ममताने विषय टाळला. दरम्यान, एका लहान मुलाचा मृतदेह शेतात गोणीत भरलेला आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृत मुलाची आई ममता आणि तिचा प्रियकर वरुण याला अटक केली.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com