
Madhya Pradesh Fraud Case: मध्य प्रदेश येथून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी केलेल्या छापेमारीमध्ये डोकं चक्रावणारी संपत्ती मिळाली आहे. फक्त ३० हजार रुपये इतका पगार असलेल्या या महिलेकडे तिच्या पगाच्या कितितरीपट जास्तीची संपत्ती मिळाली आहे. तिच्या घरात अनेक आलीशान वस्तूंसह ३० लाख रुपये किंमतीचा एकच टीव्ही आहे. (Latest Maratrhi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमा मीना या महिलेच्या घरावर पोसिलांनी धाड टाकली. हेमा एक सरकारी सहाय्यक अभियंता म्हणून काम करते. गेल्या १३ वर्षांपासून ती येथे नोकरी करत असून सध्या तिला ३० हजार रुपये इतका पगार आहे.
तिच्या पगारानुसार आतापर्यंत या महिलेकडे कमाल १८ लाख संपत्ती असणे अपेक्षीत आहे. मात्र तिच्याकडे १३ वर्षांच्या सेवेत २३२ टक्के अधिक संपत्ती मिळाली. यामध्ये २० हजार चौरसफूट जागेवर ४० खोल्यांचा बंगला आहे. तसेच फार्महाऊसवर ५० हून अधिक विदेशी जातीचे कुत्रे सापडलेत. या महिलेकडे एवढ्याश्या पगारात ६० ते ७० महागडी वाहने देखील मिळाली आहेत.
घरात कामाला १२ नोकर
४० खोल्यांच्या घरात राहणाऱ्या या महिलेच्या घरात एकून १२ नोकर आहेत. या सर्वांशी संवाद सांधण्यासाठी या महिलेने वॉकीटॉकी सर्वांना दिली आहे. महिलेच्या घरात चपात्या बनवण्याचे देखील मशीन सापडले आहे. विशेष म्हणजे २.५० लाखांच हे मशिन फक्त कुत्र्यांना चपात्या बनवून देण्यासाठी वापरले जाते. यासह २ ट्रक, १ टँकर, महिंद्रा थार अशी १० महागडी वाहनेही सापडली आहेत.
छापेमारीत नेमकं काय काय सापडलं?
भोपाळजवळच्या (Bhopal) बिलखिरिया येथील बंगला, फार्म हाऊस, लाखोंची कृषी उपकरणे, डेअरी फार्म.
खोलीत महागडी दारू, सिगारेट आदी वस्तू आहेत.
फार्म हाऊसवर अनेक परदेशी जातीचे महागडे कुत्रे.
सुमारे 60-70 विविध जातींच्या गायी.
टीव्ही, सीसीटीव्ही मॉनिटर, ऑफिस टेबल, वॉर्डरोब, रिव्हॉल्व्हिंग चेअर.
२ ट्रक, १ टँकर, थारसह १० महागडी वाहने.
लोकायुक्त डीएसपी संतोष शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, साल २०२० मध्ये पोलिस गृहनिर्माण महामंडळाच्या प्रभारी सहायक अभियंता हेमा या महिलेविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरु असताना पोलिसांनी महिलेच्या घरी धाड टाकताना सर्व सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. त्यामुळे त्यांनी साध्या वेशात येऊन आपण पशुसंवर्धन विभाचे अधिकारी असल्याचे सांगूण महिलेच्या घरात प्रवेश केला.
घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी महिलेशी बातचीत करताना एका खोलीत बातचीत सुरू केली. त्यानंतर लगेचच महिलेचा मोबाईल जप्त करून तपासाला सुरुवात केली. तेव्हा एवढी भरमसाठ संपत्ती बाहेर आली. महिला अधिकारी हेमा यांना त्यांच्या पदावरून देखील निलंबीत करण्यात आलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.