धक्कादायक! ७ वर्षीय मुलाला मगरीनं जिवंत गिळलं; गावकऱ्यांनी मगरीला पकडलं अन्...

मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Madhya Pradesh Latest News
Madhya Pradesh Latest News Saam Tv

मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) श्योपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चंबळ नदीत आंघोळ करणाऱ्या ७ वर्षाच्या मुलाला मगरीने गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही बाब गावकऱ्यांना समजताच त्यांनी मगरीला दोरीने बांधून ताब्यात घेतले आणि तोंडात जाड बांबू अडकवला आहे. यानंतर गावकरी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. (Madhya Pradesh Latest News)

हे प्रकरण मध्यप्रदेशमधील श्योपूर जिल्ह्यातील रघुनाथपूर परिसरातील रेजेता घाटातील आहे. येथे सोमवारी सकाळी लक्ष्मणसिंग केवट यांचा मुलगा अंतरसिंग केवट चंबळ नदीत अंघोळ करत होता. दरम्यान, एका मगरीने त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत ओढत नदीत नेले. हा प्रकार तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी पाहिला त्यांनी ग्रामस्थांना याची माहिती दिली. यावेळी गावकरी काठ्या आणि जाळी घेऊन तेथे आले आणि मगरीला पकडले.

Madhya Pradesh Latest News
रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! सरकारने केली मोठी घोषणा

यानंतर गावकऱ्यांनी मगरीला नदीतून बाहेर काढले आणि दोरीने बांधले. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच गावकऱ्यांपासून मगरीला वाचवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. मात्र मगर जोपर्यंत त्या मुलाला सोडत नाही, तोपर्यंत आम्ही त्या मगरीला सोडणार नाही, अस गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. हे मूल मगरीच्या पोटात असल्याचा गावकऱ्यांचा समज आहे.

Madhya Pradesh Latest News
पत्नी वारंवार पोलीस तक्रार, आत्महत्येची धमकी देत असेल तर तो पतीवर अत्याचार : हायकोर्ट

सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत गावकरी मगरीने गिळलेल्या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. या प्रकरणाची माहिती लोकांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी मगरीला पकडले पण मुलाचा काहीही पत्ता लागला नाही. एसडीआरएफची टीमही मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात मगर मुलाला गिळू शकत नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. (Madhya Pradesh Latest News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com