40 गावकरी विहिरीत कोसळले ! चौघांचा मृत्यू
40 गावकरी विहिरीत कोसळले ! चौघांचा मृत्यू Saam Tv

40 गावकरी विहिरीत कोसळले ! चौघांचा मृत्यू

विहिरीत पडलेल्या मुलीच्या बचावासाठी जमलेल्या गर्दीमुळे मध्य प्रदेशात भीषण दुर्घटना घडली. जवळपास 40 लोक विहिरीचा कठडा तुटल्यामुळे विहिरीत पडले. 30 ते 40 लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये घडली आहे.

भोपाळ : विहिरीत पडलेल्या मुलीच्या बचावासाठी जमलेल्या गर्दीमुळे मध्य प्रदेशात भीषण दुर्घटना घडली. जवळपास 40 लोक विहिरीचा कठडा तुटल्यामुळे विहिरीत पडले. 30 ते 40 लोक विहिरीमध्ये पडल्याची घटना मध्य प्रदेशमधील विदिशा जिल्ह्यातील गंजबासौदामध्ये घडली आहे.

काय घडलं नेमकं ?

गंजबासौद गावातील लालपठार गावात ही घटना घडली. एक मुलगी विहिरीमध्ये पडला होता. गावातील इतर लोक तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होते. परंतु बाहेर काढण्यासाठी विहिरीजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मुलाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गावातील काही मंडळीच विहिरीत पडले आहेत.

यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे तर इतर 11 जण अजूनही बेपत्ता आहेत. तसेच या घटनेतून १६ जणांना बाहेर काढण्यात आलेल आहे. ही सर्व घटना काल म्हणजेच गुरुवारच्या रात्रीत घडली आहे.

विहिरीचा कठडा तुटला !

एका 40 फूट विहिरीत एक आठ वर्षांची मुलगी खेळात असताना पडली. ही घटना गावभर पसरल्यानंतर, गावकऱ्यांनी परिसरात मोठी गर्दी केली होती. बाहेर काढण्यासाठी सुरु असलेल्या बचावकार्यादरम्यान, विहिरीभोवतीचा भाग खचला व पूर्ण जमलेली गर्दी आहे तशी विहिरीत कोसळली. माहिती आहे की प्रचंड गर्दीचा भार विहिरीच्या कठड्यावर पडला होता. त्यामुळे तो तुटला होता. अशी दुर्घटना झाल्याचे मध्य प्रदेश पोलिसांनी सांगितले आहे.

40 गावकरी विहिरीत कोसळले ! चौघांचा मृत्यू
ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री 'दादी सा' यांचे हृदयविकाराने निधन

मुख्यमंत्रांनी केलं दुःख व्यक्त:

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. या घटनेदरम्यान त्यांनी मृतांच्या वारसांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com