
मध्य प्रदेश: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छिंदवाडामध्ये एका लग्नघरावर अचानक शोककळा पसरली आहे. दुसऱ्या दिवशी या डॉक्टर तरुणीचे लग्न (marriage) होणार होते. परंतू, हळदीच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला आहे. यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्रातील नाशिक (Nashik) आणि मुंबईमध्ये (Mumbai) शिक्षण घेतलेल्या आणि मुंबईतच प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा मृत्यू झाला आहे. मेघा काळे असे या तरुणीचे नाव आहे. बुधवारी बाजारमधील प्रमोद महादेवराव यांची ती मुलगी होती.
हे देखील पाहा-
सकाळच्या नाश्त्यामध्ये ढोकळा हा पदार्थ ठेवण्यात आला होता. मेघा ढोकळा खात होती, तेव्हा तिला अचानक जोरात ठसका लागला, लगेचच तिने पाणी पिले. मात्र, तिला काहीच बोलता येत नव्हते. यामुळे तिची प्रकृती बाजूक होत गेली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिचा मृत्यू झाला आहे. मेघा काळे एमबीबीएस झाली होती. ती मुंबईत प्रॅक्टिस करत होती. तिचे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये झाले होते. पुढचे शिक्षण तिने नाशिक आणि मुंबईत घेतली होती.
छिंदवाडाच्या शहनाई लॉनमध्ये आज तिचे लग्न होते. परंतू, हळदीच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी नाश्तातील नमुने गोळा केले आहेत. मेघाच्या मृत्यूची कारणे शोधली जात आहेत. हे नमुने लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मेघाच्या पोस्टमार्टेम रिपोर्टची पोलीस वाट बघत आहेत, यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.