'हीरो तू मेरा हीरो है' महिला कॉन्स्टेबलने वर्दीवर बनवला व्हिडिओ; आता करतेय पश्चाताप!

महिला कॉन्स्टेबचा वर्दीवर असताना डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
Madhya Pradesh Women Police
Madhya Pradesh Women PoliceSaam Tv

हरदोई : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीजण वाटेल ते करतात. मात्र कधी-कधी प्रसिद्धी मिळवणं हे अंगलट येत. असाच काहीसा प्रकार एका महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत घडला आहे. मध्यप्रदेशातील हरदोईमध्ये एका महिला पोलीस कॉन्स्टेबला कर्तव्यावर असताना फिल्मी गाण्यावर थिरकणं चांगलंच महागात पडलं आहे. या महिला कॉन्स्टेबचा वर्दीवर असताना डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडिओ समोर येताच तिचं निलंबन करण्यात आलं आहे. (Madhya Pradesh Women Police Latest News)

Madhya Pradesh Women Police
संतापजनक! स्कूलबस चालकाचा अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार

वसुंधा मिश्रा असं निलंबित महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. वसुंधा यांनी कर्तव्यावर असताना पोलीस व्हॅनच्या सीटवर बसून एका फिल्मी गाण्यावर व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी या व्हिडिओला अक्षरश: डोक्यावर घेतलं. तर काही जणांनी कर्तव्यावर असं करणं शोभतं का? अशा प्रतिक्रिया दिल्या. दरम्यान, हा व्हिडिओ पोलीस अधीक्षकांकडे पोहचताच, त्यांनी सदरील महिला पोलीस कर्मचाऱ्यासह अन्य तीन कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे. (Madhya Pradesh Women Police)

Madhya Pradesh Women Police
धक्कादायक! शेतीच्या वादातून पोटच्या मुलांकडूनच वृद्ध पित्याची हत्या

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत या महिला कर्मचाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. माहितीनुसार, या महिला कर्मचाऱ्याचे एक-दोन-तीन नव्हे तर आठ महिला पोलिसांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हिडिओंमध्ये वसुंधा या फिल्मी गाण्यावर थिरकताना दिसत होत्या. एका व्हिडिओमध्ये तर वसुंधा यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत ‘हीरो तू मेरा हीरो हैं’ गाण्यावर रील बनवली. दरम्यान, एकापाठोपाठ एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, पोलीस अधीक्षकांनी या महिला कर्मचाऱ्यासह पोलीस कर्मचारी धर्मेश कुमार आणि योगेश कुमार यांचं निलंबन केलं आहे.

Edited By- Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com