Petrol Diesel Price Today: मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल; झटपट तपासा आजचा इंधनाचा भाव

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price Today Saam Tv

Petrol Diesel Latest Rate:  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. WTI क्रूड प्रति बॅरल 76.26 डॉलरवर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 79.80 डॉलरवर व्यवहार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता इंधनाच्या किमती सुधारल्या जातात.  (Latest Marathi News)

Petrol Diesel Price Today
Amol Kolhe Injured: अभिनेते अमोल कोल्हेंना 'शिवपुत्र संभाजी'च्या प्रयोगादरम्यान गंभीर दुखापत, कराडमधील पुढचे प्रयोग रद्द

आज बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये इंधनाच्या दरात घट दिसून येत आहे. महाराष्ट्रात पेट्रोल 41 पैशांनी तर डिझेल 39 पैशांनी स्वस्त झाले आहे. पंजाबमध्येही पेट्रोल 26 पैशांनी तर डिझेल 25 पैशांनी स्वस्त झालं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 पैशांची घसरण झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी स्वस्त झालं आहे. (Petrol Diesel Price)

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.73 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

– कोलकाता में पेट्रोल 106.03 रुपये और डीजल 92.76 रुपये प्रति लीटर

Petrol Diesel Price Today
LPG Cylinder Price: खूशखबर! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात, सिलेंडर 171 रुपयांनी स्वस्त

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com