
Mahindra Thar Accident Video: महिंद्राच्या थार गाडीची तरुणाईंमध्ये प्रचंड मोठी क्रेझ आहे. गाडीचा लूक, भन्नाट फिचर्सची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असते. त्यामुळे अनेक तरुणांचे हीच गाडी घ्यायची असे स्वप्न असते.
पण सध्या सोशल मीडियावर एक आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ टाटाच्या नॅनो आणि महिंद्रा थारच्या अपघाताचा आहे. ज्यामध्ये नॅनोच्या धडकेत थेट महिंद्राची थार पलटी झाल्याचे दिसत आहे. (Viral Video)
याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगडच्या दुर्ग येथे महिंद्रा थार आणि टाटा नॅनो कारचा भीषण अपघात झाला. पद्मनाभपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पद्मनाभपूर मिनी स्टेडियमजवळ या गाड्यांचा अपघाता झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात कारमध्ये असलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.
एक थार गाडी भरधाव वेगाने रस्यावरून जात असताना नॅनो कारला धडकली. त्यानंतर थार गाडी रस्त्यावर पलटी झाली. या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जगपाल जरेदा नावाच्या युजरने या अपघाताचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.
हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नॅनोच्या धडकेत थार पलटी झालीच कशी अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये होताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. इतकेच नव्हेतर या ट्विटमध्ये महिंद्राचे संचालक आनंद महिंद्रा यांनाही टॅग करण्यात आले आहे. तसेच टाटा कंपनीचाही या ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. “छत्तीसगडच्या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर थार गाडी घेताना लोक विचार नक्कीच करतील.” तर दुसऱ्या युजरने महिंद्रा यांना टॅग करत म्हटलं, सर, थार गाडीच्या स्थिरतेबाबत खूप मोठी समस्या आहे."
"नॅनोसारख्या कारला धडक लागल्यानंतर थार रस्त्यावर पलटी झाली. ही कार खरेदी करण्याची इच्छा होती, पण या अपघाताचा व्हिडीओ पाहिल्यानंतर कारच्या सेफ्टीबाबत मला शंका आहे.” (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.