
Mahindra Thar Viral Video: सध्या तरुणांमध्ये महिंद्रा कंपनीच्या थार गाडीची प्रचंड क्रेझ आहे. गाडीचा दमदार लूक, जबरदस्त फिचर्स आणि कसल्याही रस्त्यावर तिची रुबाबदार चाल सर्वांनाच आकर्षित करत असते. म्हणूनच थार गाडी घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु सध्या सोशल मीडियावर एक तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
हा व्हायरल एका थार गाडीचा असून यामध्ये एका शेतकऱ्याने चक्क थार गाडीला नांगर जोडत शेत नांगरल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून थार लव्हर मात्र चांगलेच संतापले आहेत, काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील कथा चला जाणून घेवू... (Viral Video)
सोशल मीडियावर शेतकऱ्यांच्या भन्नाट जुगाडाचे व्हिडिओ नेहमीच पाहायला मिळतात. शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यापासून ते जबरदस्त डोक लावून जुगाड करत असतात. सध्या एका शेतकऱ्याचा असाच एक जुगाड पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये त्याने चक्क थार गाडीचा उपयोग शेत नांगरण्यासाठी केल्याचे पाहायला मिळत आहे. (Latest Marathi Update)
या व्हिडीओमध्ये ट्रॅक्टर नसल्याने महिंद्रच्या थारला थेट रोटोवेटरशी जोडले आहे. आणि बिनधास्त शेत नांगरल्याचे दिसत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजरनी या व्हिडीओवर आता महिंद्रची ही गाडी कोणी घेणार नाही अशी प्रतिक्रीया दिली आहे.
हा व्हिडिओ गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये इंस्टाग्राम (Instagram) हॅंडल arunpanwarx ने पोस्ट केला आहे. या व्हिडीओला 40 हजाराहून अधिक लाईक्स झाल्या आहेत. तर 2 लाख 60 हजार व्यूज मिळाले आहेत. महिंद्र थारने शेत नांगरल्याने आता ट्रॅक्टर कोणी घेणार नाही पासून ते आता थार कोणी घेणार नाहीत अशा प्रतिक्रीया या व्हिडिओला आल्या आहेत. (Instagram Viral Video)
दरम्यान, अनेकांनी या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना शेतकऱ्याचे कौतुकही केले आहे. शेतकऱ्याचा नादच खुळा अशा बोलक्या प्रतिक्रिया काही जणांनी दिल्या आहेत, तर दुसरीकडे इतक्या महागड्या गाडीचा असा वापर का करताय असा सवालही अनेकांनी विचारला आहे, काहीही असले तरी या शेतकऱ्याचा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी मात्र डोक्याला हात लावला आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.