Pennsylvania Accident : भल्या सकाळी हायवेवर धडामधूम; १० वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात, भयंकर VIDEO

Major Accident in Pennsylvania Turnpike : पेनसेल्व्हिनियामध्ये गुरुवारी भल्या सकाळी दहा वाहनं एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला.
Major Accident in Pennsylvania/Social Media
Major Accident in Pennsylvania/Social MediaSAAM TV

Major Accident in Pennsylvania Turnpike :

पेनसेल्व्हिनियामध्ये सर्वात जास्त वर्दळ असलेल्या मार्गावर गुरुवारी भल्या सकाळी भीषण अपघात झाला. एकापाठोपाठ एक अशी दहा वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

नॉटिंगहॅम अग्निशमन यंत्रणेकडून या घटनेसंदर्भात माहिती देण्यात आली. फिलाडेल्फियाजवळ पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या क्रमांक १ च्या मार्गिकेवर गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. (Latest Marathi News)

एका स्थानिक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, दहा वाहने धडकून विचित्र अपघात झाला. या अपघातामुळं महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. अपघातग्रस्त वाहनांमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रेलर होते. ही वाहने एकमेकांना धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या क्राँक्रिटच्या संरक्षण भिंतींना धडकली. त्या भिंतींचा ढिगारा रस्त्यावरच पडला होता.

अपघातानंतर काही वेळानं या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. मात्र, ती संथगतीने सुरू होती. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास करण्यात येत आहे.

Major Accident in Pennsylvania/Social Media
Mumbai Airoplan Accident | मुंबई विमानतळावर खासगी विमानाचा भीषण अपघात

या अपघातानंतर तेथील केवायडब्ल्यू न्यूज रेडिओवरून श्रोत्यांना वारंवार सूचना करण्यात येत होत्या. वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्यात यावा, असे आवाहन करण्यात येत होते.

ट्रॅक्टर आणि ट्रेलर हे रस्त्याच्या मध्यभागीच अडकून पडले असून, संरक्षण भिंतीचा ढिगारा मध्यभागी असल्याने रस्त्यावर कोंडी झाली होती, असेही सांगण्यात येत होते. (Accident News)

तात्काळ मदतकार्य आणि बचावकार्य

या घटनेनंतर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दोन्ही दिशेकडील वाहतुकीवर परिणाम झाला होता. बचाव आणि मदतकार्य तात्काळ हाती घेण्यात आले. तर वैद्यकीय पथकेही तात्काळ घटनास्थळी पोहोचली होती, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.

Major Accident in Pennsylvania/Social Media
Pune Bangalore National Highway Accident News : पुणे- बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com