भारतीय जवानांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान

जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात काल घुसखोरी करण्यात आली
भारतीय जवानांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
भारतीय जवानांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नानSaam Tv

वृत्तसंस्था : जम्मू काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात काल घुसखोरी करण्यात आली होती. या घुसखोरीत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारताच्या ५ जवानांना वीरमरण आले होते. दरम्यान, जवानांच्या या बलिदानाचा भारतीय लष्कराने अवघ्या २४ तासांतच बदला घेतला आहे. पुंछनंतर शोपियाँ मधील इमामसाहब परिसरात तुलरान या ठिकाणी झालेल्या चकमकीत लष्कराने आणखी ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

आज सकाळच्या सुमारास याबाबत काश्मीर पोलिसांनी माहिती दिली आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये बिहार मधील वीरेंद्र पासवान याची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा देखील यामध्ये समावेश आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारावर २ ऑपरेशन सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

हे देखील पहा-

जम्मू- काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार की, शोपियाँमध्ये संध्याकाळी २ ऑपरेशन करण्यात आली आहेत. तुलरान या ठिकाणी चकमक सुरू झाली होती. त्याठिकाणी ३ ते ४ दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. तसेच शोपियाँ मधील खेरीपोरा या ठिकाणी देखील एक ऑपरेशन हाती घेण्यात आले होते.

मागील २४ तासात ही तिसरी चकमक आहे. मागील काही दिवसांत काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादी कारवायांनंतर सुरक्षा दलांनी मोहिमांना चांगलीच गती दिली आहे. शोपियाँ मध्ये झालेल्या चकमकीत मारण्यात आलेल्या ३ दहशतवाद्यांकडून दारू- गोळ्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. मारण्यात आलेल्या तिन्ही दहशतवादी हे लष्कर ए तोयबाच्या टीआरएफशी संबंधित होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

भारतीय जवानांची मोठी कारवाई, ३ दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
सुसाइड नोटमध्ये पंतप्रधानांचा उल्लेख: १६ वर्षीय युवकानं धावत्या ट्रेनसमोर मारली उडी

त्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख गंदरबल या ठिकाणी मुख्तार शाह अशी पटली आहे. तो बिहार मधील वीरेंद्र पासवानची हत्या केल्यानंतर शोपियाँमध्ये आला होता. पोलिसांनी त्याला सरेंडर करण्याचे देखील आवाहन करण्यात आले होते. मात्र तो ऐकला नाही. अखेर या चकमकीत तो ठार मारला गेला आहे. दरम्यान, सोमवारी पुंछ मध्ये सुद्धा दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली होती.

या चकमकीत हात असलेले दहशतवादी ऑगस्टमध्ये पुंछ मध्ये घुसखोरी करणाऱ्या समुहामधील असावेत अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पुंछ मधील चकमकीत हुतात्मा झालेल्या जवानांची ओळख नायब सुभेदार जसविंदर सिंग माना, नायक मनदीप सिंग, शिपाई गज्जन सिंग, सराज सिंग, वैसाख एच. अशी पटली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.