Pakistan Earthquake : पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप, घरांची पडझड, ९ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जखमी

Pakistan Earthquake News : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे.
Pakistan Earthquake
Pakistan Earthquake Saam TV

Pakistan Earthquake News : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी पाकिस्तान पुन्हा एकदा हादरलं आहे. पाकिस्तानमधील लाहोर, इस्लामाबाद, पेशावर, झेलमसह तब्बल ९ शहराला भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहे. मंगळवारी रात्री झालेल्या या भूकंपात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

Pakistan Earthquake
Crime News: जन्मदात्या आईनेच चिरला ३ महिन्यांच्या चिमुकलीचा गळा; नाशकातील क्रूर घटनेचा २४ तासांत छडा

दुसरीकडे पाकिस्तानबरोबर अफगाणिस्तानही भूकंपाच्या (Earthquake) धक्क्यांनी हादरला आहे. दोन्ही देशाला बसलेल्या भूकंपाची तीव्रता ६.५ तीव्रतेची असल्याची माहिती आहे. ऐन मध्यरात्री अचानक भूकंपाचे धक्के बसल्याने पाकिस्तानचे नागरिक चांगलेच घाबरले. घाबरलेल्या लोकांनी घरे आणि कार्यालयांमधून बाहेर पडण्यासाठी धावत सुटले होते.

पाकिस्तानच्या (Pakistan) वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात खोऱ्यातील १०० हून अधिक लोकांना मोठा धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या आपत्कालीन सेवांचे प्रवक्ते बिलाल फैझी यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले.

दरम्यान, या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, काही उभे असलेले लोक खाली कोसळेत. अनेक घरांची देखील पडझड झाली. या घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात होता. भूकंपामुळे काही डोंगराळ भागात भूस्खलन होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.

दिल्लीला भूकंपाचे धक्के

दिल्ली-एनसआरसहित पूर्ण उत्तर भारतातील जमीन भूकंपाने जमीन हादरली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.६ इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगणिस्तानमधील फैजाबाद सांगण्यात येत आहे. याचबरोबर पाकिस्तानातही भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com