BIG Breaking : चीनमधील गगनचुंबी इमारतीला भीषण आग; पाहा थरारक VIDEO

या थरारक घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे.
China Building Fire
China Building FireTwitter

China Building Fire : चीनमधून (China) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनच्या बीजिंग शहरात एका भल्यामोठ्या इमारतीला अचानक आग (Fire) लागली आहे. या आगीत इमारतीचे जवळपास सर्वच मजले भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याची माहिती मिळताच चीनी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. (China Building Fire Video)

China Building Fire
Baba Ramdev : योग, आयुर्वेदाविरोधात षडयंत्र रचलं जातंय; बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप

या थरारक घटनेचा व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, इमारतीच्या पहिल्या मजल्यापासून ते शेवटच्या मजल्यापर्यंत आगीचे डोंब उठत आहेत. या आगीमुळं आकाशात उंच दाट धुराचं साम्राज्य पसरलं आहे. ही इमारत जवळपास २०० मीटर अर्थात ६५६ फूट उंचीची आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी सापलेली ही इमारत चीनमधील टेलिकॉम कंपनीची आहे. या आगीत इमारतीचे जवळपास सर्वच मजले भक्ष्यस्थानी पडले आहेत. दरम्यान, आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत जीवितहानी झाली की नाही? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com