
प्रेमासाठी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही आजवर ऐकल्या असतील. प्रेमात काही जोडपी लग्नाआधी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. दोघांमध्ये काही वाद झाल्यास आत्महत्या किंवा हत्या अशा घडना समोर येतात. अशात केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने निकाल आपल्याबाजूने न लागल्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. (Latest Marathi News)
सदर घटना केरळमधील आहे. येथे ३१ वर्षीय तरुण आणि २३ वर्षीय तरुणी गेल्या एक महिन्यापासून एकत्र राहत होते. एकत्र राहत असताना तरुणीने वेगळं राहण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तरुण तिच्या प्रेमात इतका वेडा झाला की, त्याने तिला वेगळं राहण्याची परवानगी दिली नाही.
अखेर तरुणीच्या वडलांनी याबाबत कोर्टात याचिका दाखल केली. या घटनेत सुनावणीवेळी तरुण कोर्टात हजर झाला होता. न्यायाधीशांसमोर सुनावणी सुरू असताना तरुणीने आपली बाजू मांडली. माझ्या मनात तरुणाविषयी कोणतीही भावना नाही. गेल्या एक महिन्यापासून मी त्याच्यासोबत राहत आहे. कारण त्याने मला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असं तरुणीने म्हटलं.
तरुणीचं म्हणणं ऐकल्यावर न्यायाधीशांनी आपल्या निकालात तरुणीच्या आई वडिलांना तिचा ताबा दिला. या निकालानंतर तरुण प्रियकर फार संतापला. त्याने कोर्टातच आपल्या हाताची नस कापली. या घटनेची माहिती संपूर्ण कोर्टात पसरली. त्यानंतर तरुणाला वाचवण्यासाठी सगळ्यांची एकच पळापळ झाली. तरुणाला वाचवण्यासाठी आल्यावर त्याने पुन्हा आत्महत्या करण्याची धमकी दिली. सध्या तरुण सुखरुप असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.