तब्बल 300 दिवस झोपणारा कुंभकर्ण!
तब्बल 300 दिवस झोपणारा कुंभकर्ण!Saam Tv

तब्बल 300 दिवस झोपणारा कुंभकर्ण!

हा माणूस महिन्यातील तब्बल २० ते २५ दिवस झोपतो, म्हणजेच वर्षातून ३०० दिवस हा व्यक्ती झोपलेला असतो.

नागौर -  राजस्थानमधील Rajasthan नागौर जिल्ह्यात गंभीर एक दुर्मिळ आजाराने Disease त्रस्त असलेल्या एका व्यक्तीची माहिती समोर आली आहे. हा माणूस महिन्यातील तब्बल २० ते २५ दिवस झोपतो, म्हणजेच वर्षातून ३०० दिवस हा व्यक्ती झोपलेला असतो. या व्यक्तीचे नाव पुरखाराम आहे. त्याचे वय ४२ वर्षा असून हा आजार बराच काळापासून आहे.

त्याच्या घरातील लोकं त्याला झोपेतच जेवण भरवतात. डॉक्टरांनी त्याला एक गंभीर आजार असल्याचे सांगितले आहे.पुरखाराम नागौर जिल्ह्याच्या परबतसर उपखंडातील भादवा गावात राहतो. त्याचे एक किराणा मालाचे दुकान आहे. पण पुरखाराम या आजारामुळे महिन्यातील केवळ पाचच दिवस दुकान उघडू शकतो.

हे देखील पहा -

पुरखारामला  वयाच्या १८ व्या वर्षी या आजाराची लागण झाली होती. सुरुवातीच्या काळात तो ५ ते ७ तासच झोपायचा. मात्र आता  पुरखाराम हा तब्बल २५ दिवस झोपतो. सुरुवातीला देखील त्याला डॉक्टरांना दाखवले. मात्र कोणताच उपाय त्याला लागू पडला नाही.सुरूवातीला पुरखाराम जवळजवळ ५ ते ७ दिवस सलग झोपायचे. परंतु आता मात्रं सलग २५ दिवस तो झोपलेलेच असतात. त्याच्या या गंभीर आजारामुळे त्याच्या घरचे अतिशय त्रस्त झाले आहेत.

तब्बल 300 दिवस झोपणारा कुंभकर्ण!
आमदार मेघना बोर्डीकरांनीही चिखल रस्त्यावर चालून पिंप्राळा ग्रामस्थांच्या घेतल्या व्यथा जाणून

डॉक्टरांकडे नेल्यानंतर डॉक्टरांनी पुरखारामला असलेल्या एक्सिस हायपरसोम्निया या झोपा संबंधित आजाराबद्दल सांगितले. पुरखाराम आता या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात मोडतो, ज्यामध्ये रूग्ण जवळजवळ २० ते २५ दिवस झोपेतून उठत नाहीत.

डॉक्टरांनी देखील हा दुर्मिळ आजार असल्याच म्हटले. हायपरसोम्निया या आजाराने पुरखाराम त्रस्त आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार ठीक होणार नाही असे नाही पण याला योग्य उपचार गरज आहे. डॉक्टर या आजाराला दुर्मिळ आजार म्हणत आहेत असे असले तरी मात्र पुरखारामच्या कुटुंबियांनी आशा कायम ठेवली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com