अल्पवयीन मुलीशी लग्न करुन लैंगिक अत्याचार करणाऱ्याला बेड्या!

देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत.
Tamilnadu
Tamilnadusaam tv

देशात महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यात आल्यानंतरही देशातील बालविवाह (Child Marriage) थांबायचं नाव घेत नाहीत. आता तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तामिळनाडूच्या (Tamilnadu) त्रिची जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लालगुडी पोलिसांनी शनिवारी एका 23 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

पुल्लंबडीजवळील अलुथनालाईपूर येथील पी मथिवानन असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. चेन्नईतील महाविद्यालयीन प्रथम वर्षात शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीशी त्याने लग्न केले. मथिवनन हा चेन्नईतील एका खासगी कंपनीत काम करत होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

Tamilnadu
Agra: जामा मशीद मेट्रो स्टेशनचे होणार नामकरण, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

28 मार्च 2022 रोजी मथिवाननने तिच्याशी एका मंदिरात लग्न केले. त्यांच्या पालकांनी लग्न स्वीकारण्यास नकार दिला. मुलीच्या घरच्यांनीही त्यांना नकार दिला. त्यामुळे हे जोडपे एकटेच राहत होते. नंतर मथिवननने मुलीचा छळ करायला सुरुवात केली. त्यानंतर या प्रकरण तक्रार चाइल्डलाइन हेल्पलाइनमध्ये पोहोचले.

चाइल्डलाइनने जिल्हा समाजकल्याण विभागाला माहिती दिली. पुल्लंबडी युनियनच्या समाजकल्याण अधिकारी बालसुंदरीने शुक्रवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी त्याच्यावर बालविवाह प्रतिबंध कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. मथिवाननची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com