अजबच! 67 वर्षे अंघोळ नाही, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही

आजार आपल्याला होऊ नये याकरिता आपण स्वच्छते अतिशय काळजी घेत असतो.
अजबच! 67 वर्षे अंघोळ नाही, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही
अजबच! 67 वर्षे अंघोळ नाही, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाहीSaam Tv

वृत्तसंस्था: कोणताही आजार आपल्याला होऊ नये याकरिता आपण स्वच्छते अतिशय काळजी घेत असतो. रोज अंघोळ (bathing) करत असतो, स्वच्छ धुतलेले कपडे घालत असतो, स्वच्छ पाणी (Water) पित असतो, स्वच्छ पद्धतीने बनवलेले पदार्थ (Substance) खात असतो, घर आणि आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवत असतो. इतकी काळजी घेऊन देखील आपल्याला काही ना काही आजार होतच असतो. पण एका व्यक्तीने मात्र मागील ६७ वर्षे अंघोळच केली नाही. इतकेच नव्हे तर कचरा खाऊन तो जगत आहे. पण तरी त्याला कोणत्याही प्रकारचा आजार झाला नाही.

हे देखील पहा-

वयाच्या ८७ मध्ये देखील ही व्यक्ती एकदम ठणठणीत आहे. इराण मधील ८७ वर्षांचे अमोउ हाजी (Amou Jaji) खूप वर्षे फुटपाथवर राहत आहेत. मागील ६७ वर्षांपासून त्यांनी अंघोळ देखील केली नाही. आपले कपडे देखील धुतले नाही. कचऱ्यात पडलेले खाद्यपदार्थ खाऊन ते आपले पोट भरत आहेत. अस्वच्छता यामध्ये ते जगत आहेत. पण तरी त्यांच्या आरोग्यावर काहीच दुष्परिणाम झाला नाही. अमोउ यांची वैद्यकीय (Medical) तपासणी करण्यात आली आहे. त्यांची पूर्ण स्कॅनिंग (Scanning) करण्यात आले आणि त्यांचे इतके उत्तम आरोग्य (Health) बघून तज्ज्ञ देखील हैराण झाले आहेत.

अजबच! 67 वर्षे अंघोळ नाही, खातात कचरा; तरी 87 वर्षांच्या आजोबांना एकही आजार नाही
Facebookवर लफडं: 2 मुलांच्या आईचे प्रियकरासोबत पलायन

अमोऊ हाजी सांगत असतात, गावाबाहेर (village) एका खड्ड्यात ते राहतात. आजूबाजूचे लोक त्यांना केव्हातरी खायला देत असतात. नाहीतर ते रस्त्यावर, कचऱ्यात फेकले असलेले पदार्थ खात असतात. नाहीतर मृत, सडलेले जनावरांचे मांस खाऊन पोट भरत असतात. रस्त्याच्या बाजूला जाणाऱ्या पाण्यावरच ते आपली तहान भागवत असतात. तरी ते निरोगी आहेत. अस्वच्छतेनेच त्यांना मजबूत बनवले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com