iPhone साठी डिलिव्हरी बॉयची हत्या, मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला; आरोपीचं CCTV फूटेजही आलं समोर

कर्नाटकमधील हसन येथील ही घटना आहे.
Karnataka
KarnatakaSaam TV

Crime News : आयफोनसाठी ग्राहकाने डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन आला त्यावेळी ग्राहकाकडे पैसे नसल्याचं कळालं त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर ग्राहकाने डिलिव्हरी बॉयची हत्या केली. कर्नाटकच्या हासन येथील ही घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय आरोपी हेमंत दत्ता याला सेकंड हँड आयफोन घ्यायचा होता. पण तो घेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. यानंतर दत्ता याने एक कट रचला. त्यानुसार, त्याने एका ई-कॉमर्स वेबसाइटवरून सेकंड हँड आयफोन बुक केला. आयफोन डिलिव्हरीची जबाबदारी हेमंत नाईक नावाच्या 23 वर्षांच्या तरुणाकडे होती. (Latest News)

Karnataka
Bhagat Singh Koshyari: 'तर दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांची नियुक्ती केली असती…' कोश्यारींचे मोठे विधान

हेमंत फोन डिलिव्हरीसाठी आरोपीच्या घरी पोहोचला. मात्र आरोपीकडे पैसे नसल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आरोपीने धारदार चाकूने डिलिव्हरी बॉयवर हल्ला केला. ज्याच्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. हेमंतची हत्या केल्यानंतर आरोपीने डिलिव्हरी बॉयचा मृतदेह तीन दिवस घरातच ठेवला.

यानंतर आरोपीने मृतदेह एका गोणीत भरून तीन दिवसांनी बाहेर फेकून दिला. एवढेच नाही तर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने डिलिव्हरी एजंटच्या मृतदेहावर पेट्रोल ओतून पेटवून दिला.

आरोपी मृतदेह घेऊन दुचाकीवरून रेल्वे ट्रॅकच्या दिशेने जाताना सीसीटीव्ही कॅमऱ्यात दिसला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावला. दोन दिवसांपूर्वीही तो पेट्रोल पंपावरून बाटलीत पेट्रोल खरेदी करताना दिसला होता.

Karnataka
Raigad News : दारुच्या नशेत तोल गेला, इमारतीवरुन पडून 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

तपासादरम्यान, पोलिसांनी डिलिव्हरी बॉयचे फोन कॉल्स ट्रेस केले तेव्हा आरोपीचा शोध लागला. आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com