Viral Video: डोक्यावर ओझं, प्रचंड Traffic अन् हात सोडून पठ्ठ्या सायकलवर सुसाट; Video पाहून खुद्द IPS अधिकाऱ्याने ठोकला सलाम

हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण खुद्द एका IPS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ शेअर करत, या सायकलस्वाराला सलाम ठोकला आहे.
Viral Video
Viral VideoSaam tv

Viral Video: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर रोज नवनवे व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यावर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देताना दिसतात. कधी कधी हे व्हिडिओ इतके चकित करणारे असतात की पाहणाऱ्यालाही डोळ्यावर विश्वास बसणार नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एका सायकलस्वाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमधील सायकलस्वाराने असा पराक्रम केला आहे. जो पाहून तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. पण असे असले तरी हा व्हिडिओ मात्र खरा आहे. काय आहे हा व्हायरल व्हिडिओ आणि या व्हिडिओमधील सायकलस्वाराची करामत चला जाणून घेवू. (Viral Video)

Viral Video
10-Year-Girl-Molested In Maharashtra : दहा वर्षाच्या मुलीवर तिघांचा सामुहिक अत्याचार

जग कितीही आधुनिक झालं तरी सामान्य जनतेला आपल्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा पुर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यासाठी त्यांची रोजची तारेवरची कसरत सुरू असते. सध्या या व्हायरल व्हिडिओमध्येही असाच एक मुलगा दिसत आहे, ज्याची सायकलस्वारी पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एक मुलगा एका गाड्यांची गर्दी असलेल्या रस्त्यावरुन हात सोडून अगदी आरामात सायकल चालवत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे ता तरुणाने डोक्यावर अवजड सामान घेतले आहे, त्या सामानाला त्याने दोन्ही हातांनी पकडले आहे, आणि अगदी जोरात सायकल चालवत तो गर्दीतून मार्ग काढताना दिसत आहेत. सायकल चालवताना त्याचा कॉन्फिडन्स बघून नेटकरी मात्र थक्क झाले आहेत.

Viral Video
Ind vs SL ODI Siries: उद्यापासून भारत- श्रीलंका ODI मालिका रंगणार, कोणाचे पारडे जड? पहा संपूर्ण वेळापत्रक...

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मिडीयावर (Social Media) तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोबतच त्यांनी या व्हिडिओला आयुष्यात फक्त इतका आत्मविश्वास हवा असा जबरदस्त कॅप्शनही दिला आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत सोशल मीडियावर 8 लाख 46 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 44 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी या सायकलस्वाराचे जोरदार कौतुक केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com