Video : "तू Mia Khalifa ला कसं काय ओळखतो?" हनिमूनमध्ये वाद, नवऱ्याला ५ लाखांचा फटका

A man spotted Mia Khalifa while on his honeymoon : आपण थांबलो आहे त्याच हॉटेलात मिया खलीफाही थांबली असल्याचं त्याला कळलं आणि तो वेगळ्याच जगात हरवून गेला.
Video : "तू Mia Khalifa ला कसं काय ओळखतो?" हनिमूनमध्ये वाद, नवऱ्याला ५ लाखांचा फटका
A man spotted Mia Khalifa while on his honeymoonInstagram/@miakhalifa Twitter/@miakhalifa

प्रसिद्ध पॉर्नस्टार मिया खलीफाने (Mia Khalifa) आता पॉर्न इंडस्ट्री सोडली असली तरी ती अजूनही कायम चर्चेत असते. कधीकाळी क्रमांक एकची पॉर्नस्टार असेलेली मिया आता ते काम करत नसली तरी ती सामाजिक जीवनात आणि सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असते. नुकतीच मियाबद्दल एक नवी बातमी (Viral News) समोर आली आहे. मिया खलीफा हिच्यामुळे हनिमूनला आलेल्या दाम्पत्यामध्ये वाद झाला, मियाने हा वाद शातंही केला, पण त्यासाठी समोरील महिलेल्या नवऱ्याला तब्बल पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे. यासगळ्या प्रकरणात मियामुळे त्या महिलेच्या पतीला पाच लाख रुपये जागेवर मोजावे लागले आहे. (Mia Khalifa Latest News)

हे देखील पाहा -

A man spotted Mia Khalifa while on his honeymoon
Mia Khalifa Photos | मिया खलीफाच्या संपूर्ण शरीरावरील १३ टॅटू आणि त्यांचा अर्थ...

नेमकं काय आहे प्रकरण?

त्याचं झालं असं की, पॅरिसमध्ये एक नवविवाहित दाम्पत्य हनिमूनला आणि जेवणासाठी एका हॉटेलात गेलं होतं. याच हॉटेलमध्ये मिया खलीफा हीदेखील थांबली होती. लिया मारिएला (Lya Mariella) नावाची महिला आणि तिचा पती मधुचंद्राची रात्र साजरी करण्यासाठी खूपच एक्साईटेट होते. मात्र रात्रीचं जेवण करत असताना लिया मारिएला हिच्या नवऱ्याला आपण थांबलो आहे त्याच हॉटेलात मिया खलीफाही थांबली असल्याचं कळलं. त्याने मिया खलीफाला पाहिल्यावर तो वेगळ्याच जगात हरवून गेला. त्याने लगेचच आपल्या खिशातून मोबाईल काढला आणि लांबूनच मिया खलीफाचे फोटो घेतले आणि आपल्या सर्व मित्रांना सांगू लागला. समोर त्याची बायको बसली आहे हे तो काही क्षणासाठी जणू विसरलाच होता.

पत्नीची (Lya Mariella) नाराजी

आपला पती मिया खलीफाला ओळखतो तिला पाहून एक्साईटेड होतो हो कळल्यावर लिया मारिएला ही तिच्या पतीवर प्रचंड नाराज झाली. लिया मारिएला ही एक सोशल मीडिया इंफ्लूएंसर आहे. तिने लगेचच टिकटॉकवर लाईव्ह येत आपल्या पतीच्या कृत्याबद्दल सांगितलं. तिच्या व्हिडिओत लिया मारिएला म्हणाली की, "तुम्ही पॅरिसमध्ये तुमच्या पतीसोबत जेवत आहात आणि तो मात्र मिया खलिफाला पाहतो". तिने असेही लिहिले की तिचा नवरा उत्साहित झाला आणि त्याने आपल्या सर्व मित्रांना मेसेज पाठवला." तिचा हा व्हिडिओ मियाने पहिला आणि कमेंट केली की, "माझा नवरा संपूर्ण वेळ त्याच्या फोनवर होता, मी म्हणते की आम्ही ते सर्व फेकून देऊ आणि उद्या खरेदीला जाऊ" मियाने याबाबतचं ट्वीटही केलं आहे.

पत्नीला खूश करण्यासाठी पाच लाखांचं गिफ्ट

मियाला ओळखल्यामुळे आणि उत्साही झाल्यामुळे आपल्या पतीवर नाराज झालेली लिया मारिएला हिची तिच्या पतीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तिनेही या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि सहजासहजी हार मान्य केली नाही. अखेर तिचे मन वळवण्यासाठी नवऱ्याने तिला महागडी भेटवस्तू दिली. आपल्या पत्नीसाठी सॉरी गिफ्ट म्हणून पतीने महागडी बॅग खरेदी केली. पतीने तिला बिर्किन नावाची ब्रँडेड बॅग खरेदी केली. बिर्किन नावाच्या ब्रँडच्या सर्वात स्वस्त बॅगची किंमतही सुमारे ५ लाख रुपये आहे. यानंतर पत्नीची नाराजी दूर झाली. यावर लियाने पोस्ट केलं की, "मी सध्या रस्त्याच्या पलीकडे हर्मीस येथे आहे, मला येथे मोकळ्या मनाने भेटा". यावर मिया खलीफाने कमेंट केली की, "चांगले, तो तुला एक बिर्किन देतो". सर्वात स्वस्त बर्किन बॅगची किंमत सुमारे पाच लाख रुपये आहे. या सगळ्या प्रकारात मिया खलीफा आणि लिया मारिएला या दोघी तर आनंदी झाल्या पण, पतीला विनाकारण पाच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com