Viral Video : सिंहाशी मस्ती करणं आलं अंगाशी; पर्यटकाचं बोट पकडलं, झाले वांदे...

Jamaica Zoo Lion Viral Video : मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जमैकाच्या प्राणीसंग्रहालयातील (Jamaica Zoo) आहे.
man was playing with lion he eat his finger video goes viral on internet
man was playing with lion he eat his finger video goes viral on internetTwitter/ @OneciaG

Lion Ripped Off Man's Finger : पाळीव प्राणी आणि वन्य (Wild Animals) प्राणी यांच्यात खूप फकर असतो. प्राणी कोणताही असो त्याला त्रास देण हे योग्य तर नाहीच पण धोकादायकही आहे. याचीच प्रचिती एका पर्यटकाला आली आहे. प्राणी संग्रहालायात जाऊन एका सिंहाशी मस्ती करणं एका पर्यटकाला चांगलचं महागात पडलं आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Lion 'bites off' man's finger at Jamaica zoo in horrifying footage - Watch viral video)

हे देखील पाहा -

या व्हिडिओमध्ये प्राणीसंग्रहालयातील सिंह (Lion) एका व्यक्तीच्या हाताचे बोट चावून घेतो. या संपूर्ण अपघाताचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ जमैकाच्या प्राणीसंग्रहालयातील (Jamaica Zoo) आहे. व्हिडिओमध्ये सिंह एका माणसाचे बोट जाळीतून पकडतो आणि तो तोडल्याशिवाय सोडत नाही. रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडिओ जमायका प्राणीसंग्रहालयाचा आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, प्रत्येकजण सिंहाच्या पिंजऱ्याबाहेर व्हिडिओ बनवताना दिसत आहे. मग एक माणूस सिंहाशी टाईपास करू लागतो. तो माणूस त्यांच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि मग अचानक सिंह त्याचा हात पकडतो. हा माणूस बोट ओढण्याचा प्रयत्न करतो पण अपयशी ठरतो.

man was playing with lion he eat his finger video goes viral on internet
Video: पॅरासेलिंग करताना दोरीच तुटली; पॅराशूट हवेत असतानाच तिघे खाली कोसळले

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. काही लोक या व्यक्तीला मूर्ख म्हणत आहेत. तर काही लोक त्यांना मूक प्रेक्षक म्हणत आहेत. लोक कमेट्समध्ये म्हणतात की, जेव्हा हे घडले तेव्हा लोकांना गार्डला बोलवावे लागले. घटनास्थळी सुरक्षारक्षक नव्हते का? मिळालेल्या माहितीनुसार प्राणीसंग्रहालयात एखादी व्यक्ती प्राण्यांसोबत मस्ती करताना ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात प्राणी संग्रहालयातील सिंहाने एखाद्या व्यक्तीला मारले किंवा गंभीर जखमी केले आहे. त्यामुळे कधा प्राणी संग्रहालयात गेले किंवा जंगल सफारीला गेले की, वन्य प्राण्यांशी पंगा घेऊ नका अन्यथा महागात पडू शकते.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com