Yuganda: वा रे पठ्ठ्या! 12 महिलांसोबत लग्न अन् 107 मुलांचा बाप; आता घेतला 'हा' मोठा निर्णय

12 बायका आणि 102 मुले असलेल्या या व्यक्तीने पालनपोषणाचा खर्च परवडत नसल्याने पुढे मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे.
1970 मध्ये केले होते पहिले लग्न
1970 मध्ये केले होते पहिले लग्नCredit: GettyImages

Yuganda News: दोन बायका, तीन बायका असणाऱ्या लोकांच्या अनेक व्यक्तींबद्दल तुम्ही आजपर्यंत ऐकले असेल. पण जर एखाद्याला 12 आणि 102 मुले असतील तर? विश्वास बसणार नाही पण ही बातमी खरी आहे. 12 बायका आणि 102 मुले असलेल्या या व्यक्तीने पालनपोषणाचा खर्च परवडत नसल्याने पुढे मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू. (Family)

1970 मध्ये केले होते पहिले लग्न
Dipali Sayyed Twitte | दिपाली सय्यद यांच्या ट्विटवर पाहा काय म्हणाले भरत गोगावले

युगांडामधील एका व्यक्तीला तब्बल 12 बायका आणि 102 मुले असल्याच्या बातमीने सर्वांना चकित केले आहे. मुसा हससया असे या इसमाचे नाव असून तो युगांडामधील बुगिसाचा रहिवासी आहे. तो ६७ वर्षाचा असून या सर्व मोठ्या कुटूंबाचा खर्च झेपत नसल्याने त्याने यापुढे मुल होऊ न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या 12 पत्नींना गर्भनिरोधक गोळी वापरण्यास सांगितले आहे.

संसाधने मर्यादित असल्याने मी जास्त मुले वाढवू शकत नाही. म्हणूनच मी गरोदर असलेल्या सर्व पत्नींना गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचा सल्ला दिला आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे. त्याचबरोबर त्यांनी चारपेक्षा जास्त लग्न करु इच्छिणाऱ्या पुरूषांना असे न करण्याचा सल्लाही दिला आहे. मुसाला 568 नातवंडे असून ते सर्वजण 12 खोल्यांच्या घरात एकत्र राहतात.

1970 मध्ये केले होते पहिले लग्न
Navneet Rana : फडणवीसांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य अन् उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील - नवनीत राणा

मुसाने पहिले लग्न 1971 मध्ये झाले होते. यावेळी त्याची पहिली पत्नी हनिफाने मुलीला जन्म दिला होता. माझ्याकडे त्यावेळी पैसा होता त्यामुळे मी कुटूंब वाढवण्याचा निर्णय घेतला असे मुसा म्हणतो. मात्र आता मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांचे पालनपोषण करण्यासाठी पैसा नसल्याने मुसाने सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com