Tripura: माणिक साहा त्रिपुराचे 11 वे मुख्यमंत्री, शपथ घेताच म्हणाले...

बिप्लब देव यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने (BJP) त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे.
Tripura: माणिक साहा त्रिपुराचे 11 वे मुख्यमंत्री, शपथ घेताच म्हणाले...
Manik SahaSaam TV

त्रिपुरा: माणिक साहा (Manik Saha) यांनी त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते राज्याचे 11 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. बिप्लब देव यांच्या राजीनाम्यानंतर भाजपने (BJP) त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते म्हणाले, "आम्ही पीएम मोदी आणि भाजपच्या विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जाऊ. आम्ही त्रिपुरातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासोबतच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखू. आमच्यापुढे कोणतेही राजकीय आव्हान नाही. (Manik Saha takes oath as the Chief Minister of Tripura)

साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर चार वर्षांनी माणिक साहांना 2022 मध्ये प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले होते. ते त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही झाले. साहा यांची नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांची नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली आहे. माणिक साहा हे व्यवसायाने डेंटिस्ट असून त्यांची प्रतिमा अत्यंत स्वच्छ मानली जाते.

साहांची 2016 मध्ये काँग्रेसची सोडचिठ्ठी

माणिक साहा हे त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. मुख्य प्रवाहातील राजकारणात येण्यापूर्वी ते त्रिपुरा मेडिकल कॉलेज, हापानिया येथे प्राध्यापक होते. साहा यांनी 2016 मध्ये काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना 2020 मध्ये प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आणि या वर्षी मार्चमध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर साहा म्हणाले की, मी पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे आणि यापुढेही राहणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.