Manipur: मणिपूरमध्ये लष्कराच्या छावणीला भूस्खलनाचा तडाखा, बचावकार्य सुरू

या घटनेनंतर लष्कराने बचावकार्य सुरू केले आहे.
Manipur Rescue operation, Manipur Latest Marathi News
Manipur Rescue operation, Manipur Latest Marathi NewsSaam Tv

इंफाळ: मणिपूर (Manipur) राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगराळ भागात सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. मनिपूरमधील नोनी जिल्ह्यात बुधवारी रात्री तुपुल रेल्वेस्थानकाजवळील १०७ प्रादेशिक लष्कराच्या छावणीला परिसरात भूस्खलन झाले आहे. या घटनेनंतर लष्कराने बचावकार्य सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे २० जण अद्याप बेपत्ता आहेत.(Manipur Latest Marathi News)

Manipur Rescue operation, Manipur Latest Marathi News
कोरोनाची चौथी लाट आली? देशातील 24 तासांतील आकडेवारी उरात धडकी भरवणारी

मिळालेल्या माहितीनुसार, जिरीबामला इंफाळशी जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. त्याच्या सुरक्षेसाठी १०७ टेरिटोरियल आर्मीचे जवान तैनात करण्यात आले होते. बुधवारी रात्री येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. यानंतर गुरुवारी सकाळी लष्कर, आसाम रायफल्स, मणिपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बचावकार्य सुरू करण्यात आले. या बचावकार्यात त्या ठिकाणी असणाऱ्या उपकरणे वापरली जात आहेत.

Manipur Rescue operation, Manipur Latest Marathi News
एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट; म्हणाले भाजपसोबत अद्यापही मंत्रिपदाबाबत...

या घटनेनंतर सुमारे २० जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांचा शोध सुरू आहे. यामध्ये हेलिकॉप्टरचीही मदत घेतली जात आहे, मात्र खराब हवामानामुळे बचाव पथकाला सतत अडचणी येत आहेत. काही जखमींना कॅम्पजवळून बाहेर काढून नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर जखमींना इम्फाळला पाठवण्यात येत आहे, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com