Manipur Violence: मणिपूरमध्ये हिंसाचार; ७५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं, आसाम रायफल्सने काढला फ्लॅग मार्च

Manipur Big News: मणिपूरमध्ये हिंसाचार; ७५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं
Manipur Violence
Manipur ViolenceSaam TV

Manipur Violence: मणिपूरमध्ये आदिवासी आंदोलनादरम्यान हिंसाचार उसळल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्स जवानांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री लष्कर आणि आसाम रायफल्सला पाचारण करण्यात आले आणि राज्य पोलिसांसह सैन्याने सकाळपर्यंत हिंसाचार आटोक्यात आणल्याचे सांगण्यात येत आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्लॅग मार्च काढण्यात येत आहे.

Manipur Violence News Update : हिंसाचारग्रस्त भागात लष्कर आणि रायफल्सच्या जवानांनी फ्लॅग मार्च केला

लष्कर आणि आसाम रायफल्सच्या जवानांनी चुराचंदपूरच्या खुगा, टाम्पा, खोमोजन्नब्बा भागात, मंत्रीपुखरी, लामफेल, कोईरंगी आणि काकचिंग जिल्ह्यातील सुगानू येथे फ्लॅग मार्च आणि हवाई सर्वेक्षण केले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सच्या एकूण ५५ बटालियन्स तैनात करण्यात आल्या आहेत. अतिरिक्त १४ बटालियन्स देखील तात्काळ सूचनेवर तैनात करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.  (Latest Marathi News)

Manipur Violence
Sharad Pawar Latest News: मोठी बातमी! पुढील २ दिवसात अंतिम निर्णय घेऊ, शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Manipur Violence News: मणिपूरमधून आतापर्यंत ७५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले

हिंसाचारग्रस्त भागातून आतापर्यंत 7,500 लोकांना सुरक्षा दलांनी सुरक्षित स्थळी हलवले आहे. अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.

Why Did Violence Happen in Manipur? : मणिपूरमध्ये हिंसाचार का झाला?

मणिपूर उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश एमव्ही मुरलीधरन यांनी नुकताच एक आदेश दिला होता. या आदेशात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मेईतेईला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीवर विचार करण्यास सांगितले होते.

Manipur Violence
Adipurush: प्रतीक्षा संपली! रामाच्या रूपात येतोय प्रभास; 'या' तारखेला रिलीज होणार 'आदिपुरुष'चा ट्रेलर!

मेईतेई समाजाला एसटी दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या संघटनेचे म्हणणे आहे की, हा केवळ नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षणाचा मुद्दा नसून तो वडिलोपार्जित जमीन, संस्कृती आणि अस्मितेचा मुद्दा आहे. म्यानमार आणि शेजारील राज्यांमधून येणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांकडून मेईतेई समुदायाला धोका असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

याच्या निषेधार्थ ऑल ट्रायबल स्टुडंट युनियन ऑफ मणिपूर (एटीएसयूएम) ने 'आदिवासी एकता मार्च' काढला होता. या एकता मोर्चात हिंसाचार झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com